जि. प. शाळेत दर्जेदार शिक्षण : माहेश्वरी

जि. प. शाळेत दर्जेदार शिक्षण : माहेश्वरी

वावी । वार्ताहर | Vavi

कॉन्व्हेंट स्कूलच्या (Convent School) तोडीस तोड उच्च दर्जाचे आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण (High standard and quality education) घोटेवाडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (Ghotewadi Zilla Parishad Primary School) दिले जात असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ सिन्नरचे अध्यक्ष निशांत माहेश्वरी (Rotary Club of Sinner President Nishant Maheshwari) यांनी केले.

तालुक्यातील घोटेवाडी (Ghotewadi) येथे रोटरी क्लब ऑफ सिन्नरच्यावतीने (Rotary Club of Sinner) विद्यार्थ्यांना (students) स्कूल बॅग (School bag) भेट देण्यात आल्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरीचे माजी अध्यक्ष वैभव मुत्रक, सदस्य संजय आनेराव, दत्तात्रय गोळेसर, नाना भगत, मच्छिंद्र चिने, सरपंच मंजुश्री घोटेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान घोटेकर,

सोसायटीचे चेअरमन सुखदेव वैराळ, शालेय समितीचे अध्यक्ष वसंत ढमाले, उपाध्यक्ष साईनाथ सरोदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष जितेंद्र घोटेकर, प्रवीण घेगडमल, सुनील घोटेकर, सुरेश घोटेकर, रघुनाथ कांदळकर, बाळनाथ घोटेकर, रायभान घोटेकर, ग्रामसेवक संदीप वाकचौरे, मुख्याध्यापक संतोष झावरे, शिक्षक पोपट नागरगोजे, सुरेश दिघे, सुरेखा शेळके, युवराज राऊत, रोहिणी घोटेकर आदी उपस्थित होते.

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षकांनी शाळेला आकार देत ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्यात आपले सर्वस्व अर्पण केल्याचे पाहून पाहुण्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रोटरीच्या वतीने वैभव मुत्रक, संजय आणेराव, दत्तात्रय गोळेसर यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेत राबवल्या जाणार्‍या विविध उपक्रमांचे कौतुक केले. मुख्याध्यापक संतोष झावरे यांनी प्रास्ताविकात लेखाजोखा मांडला.

रोटरी क्लबने यापूर्वी शाळेसाठी वाटर फिल्टर भेट दिले आहे. त्याचप्रमाणे कोरोनातही बेड भेट देऊन कोरोना विलगीकरण कक्षास हातभार लावला. आताही सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन शाळेला आणि गावाला उपकृत केल्याची भावना भरत घोटेकर यांनी व्यक्त केली. सुरेश दिघे यांनी सूत्रसंचालन केले. आभार पोपट नागरगोजे यांनी मानले.

कृतियुक्त शिक्षणाने पाहुणे प्रभावित

पाहुण्यांनी सांगितलेली विविध अवघड नावे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी केलेल्या हावभावातून क्षणात सांगितल्याने पाहुणे अवाक झाले. तसेच संगीत आणि कवायतमय पाढेही विद्यार्थ्यांनी सादर केले. हावभाव आणि कृतीयुक्त शिक्षण पाहून पाहुणेही अवाक झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com