विद्यार्थ्यांत गुणात्मक वाढ गरजेचीः अ‍ॅड ठाकरे

विद्यार्थ्यांत गुणात्मक वाढ गरजेचीः अ‍ॅड ठाकरे

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

आज संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीकडे अधिक लक्ष देणे गरजचे आहे. विद्यार्थ्यांच्या (students) घडणीत शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते.

म्हणून शिक्षकांनी (teachers) विद्यार्थ्यांकडे अधिकाधिक लक्ष देण्याची गरज आहे. खरोखरच ज्या समाजधुरिणांनी संस्थेच्या घडणीत महत्वाचे योगदान दिले त्यांचे विचार समाजात पोहचविण्याची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस अ‍ॅड.नितिन ठाकरे (MVP General Secretary Adv. Nitin Thackeray) यांनी केले आहे.

येथील मविप्रच्या क.का. वाघ महाविद्यालयात (KK Wagh College) सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात अ‍ॅड.ठाकरे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.अशोक चोपडे, आमदार दिलीप बनकर, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक शोभा बोरस्ते, भागवतबाबा बोरस्ते, शांताराम बनकर, तानाजी बनकर, गणेश बनकर, उल्हास मोरे, कादवा सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, रवींद्र मोरे,

रामभाऊ माळोदे, संपत मोरे, शांताराम बनकर, मविप्र शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉ.आर.डी. दरेकर, डॉ.अशोक पिंगळे, डॉ.नितीन जाधव, प्रा.अजित मोरे, संजय पाटील, प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड.ठाकरे म्हणाले की, सत्यशोधक विचारांची आज समाजाला गरज आहे. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. संस्थेच्या प्रत्येक शाखेत असे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाज सुधारणा, शिक्षणात क्रांती केली. त्यांनी शेतकर्‍याचे आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म सारखे ग्रंथ लिहून समाजाला विचार दिला.

सर्व अनर्थाचे कारण अविद्या असून शिक्षणानेच (education) समाज घडणीचे काम होवू शकते हे आपल्याला कर्तृत्वाने पटवून दिल्याचे अ‍ॅड.ठाकरे म्हणाले. आपल्या मनोगतात डॉ.अशोक चोपडे म्हणाले की, महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला आज 150 वर्ष पुर्ण होत आहे. बहुजन समाजाला (Bahujan society) धार्मिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी तसेच शिक्षणप्रसाराचे कार्य, सामाजिक सुधारणा, शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.

मविप्र समाज संस्थेचे आद्य संस्थापक, कर्मवीरांनी महात्मा ज्योतीराव फुले यांचे सत्यशोधकिय विचार शिक्षणाच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून समाजात रुजविले. नाशिक जिल्ह्यात मराठा विद्या प्रसारक संस्था स्थापन करून बहुजन समाजाच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविला. पण याची बीजे सत्यशोधक समाजाच्या विचारात व मराठा शिक्षण परिषदेत रुजलेली आहे. तेव्हा आपली मोठी जबाबदारी आहे की, सत्यशोधक समाजाचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे मत डॉ.चोपडे यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार दिलीप बनकर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी वैयक्तिक 5 लाख रुपयांचा धनादेश संस्थेला देणगी म्हणून दिला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा.ज्ञानोबा ढगे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, स्वागतगीत व समाजगीताने तर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सभासद, नागरिक व क.का. वाघ महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com