आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास अपेक्षित: आ. दिलीप बोरसे

आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास अपेक्षित: आ. दिलीप बोरसे
Dipak

मुंजवाड । वार्ताहर Munjwad-satana

शिक्षक संघ (Teachers Union) ही राज्यातील शिक्षकांची मोठी संघटना असून या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. शिक्षक (teacher) हा समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांनी आदिवासी भागातील (tribal area) विद्यार्थ्यांच्या (students) गुणात्मक विकासासाठी (Qualitative development) प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आ. दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांनी व्यक्त केली.

सटाणा (satana) येथील आप्पाश्री लॉन्समध्ये बागलाण तालुका (Baglan taluka) प्राथमिक शिक्षक संघाचे (Primary Teachers Association) त्रैवार्षिक अधिवेशन राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना आ. बोरसे बोलत होते. प्रारंभी संघटनेचे दिवंगत जिल्हाध्यक्ष आर.के. खैरनार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आ. बोरसे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे नेते युवराज पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. संजय चव्हाण, जि.प. सदस्य यतीन पगार, सदस्या मीना मोरे, रेखा पवार, प.स. सभापती इंदुबाई ढुमसे, माजी जि.प. सदस्य प्रा. अनिल पाटील, बाजार समिती सभापती पंकज ठाकरे, नगराध्यक्ष सुनिल मोरे, संघटनचे राज्य उपाध्यक्ष मिलिंद गांगुर्डे, रवींद्र थोरात, प्रमोद लोखंडे, जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, सरचिटणीस धनराज वाणी, बाजीराव सोनवणे, संजय शेवाळे, राजेंद्र पाटील, प्रमोद शिरसाठ, तालुकाध्यक्ष अरुण कापडणीस, धनंजय आहेर, नंदू गांगुर्डे, चंद्रशेखर धाबळे आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक संघातर्फे मान्यवरांसह गुणवत्त विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आ. संजय चव्हाण, माजी शिक्षण सभापती यतीन पगार शिक्षक संघाचे नेते युवराज पवार, नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनीही मार्गदर्शन केले. अधिवेशनाच्या विषय सभेत कार्यकारिणीत स्थान मिळावे यासाठी 30 ते 35 शिक्षकांनी आपल्या कार्याचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. निरीक्षक म्हणून शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे उपस्थित होते. अधिवेशनात बागलाण तालुका शिक्षक संघ व शिक्षक संघ महिला आघाडी निवड करण्यात आली. निवड होताच गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

त्यात बागलाण तालुका (Baglan taluka) प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष देवा पवार, सरचिटणीस संतोष सावंत, कार्याध्यक्ष संजय भामरे, अरुण भामरे, कोषाध्यक्ष दिनेश सोनवणे , आबा पवार, तालुका नेते भीमराव कापडणीस, कार्यालयीन चिटणीस नितीन भामरे, सहचिटणीस संजय पगार, संपर्क प्रमुख सुरेश पगार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शरद भामरे, जिल्हा प्रतिनिधी शरद खैरनार, विजय जाधव, यशवंत कापणीस, दीपक भामरे, अशोक अहिरे, तालुका प्रसिद्धीप्रमुख दिनेश सावळा, प्रशांत बैरागी, उपाध्यक्ष धनंजय सावळा,

यशवंत देवरे, आबा भामरे, सल्लागार अशोक अहिरे, चिंतामण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर मोरे, रवींद्र देशपांडे तर महिला आघाडी कार्यकारिणीत अध्यक्षा सुजाता गायकवाड, सरचिटणीस चारुशीला बच्छाव, कार्याध्यक्षा रोहिणी सोनवणे, ज्योती देवरे, कोषाध्यक्षा मिनाक्षी भामरे, पुष्पांजली कापडणीस, सल्लागार लीलावती खैरनार, जिल्हा प्रतिनिधी वैशाली बच्छाव, तालुका प्रतिनिधी सुरेखा देवरे, उपाध्यक्षा शर्मिला पाटील यांची निवड केली गेली. अधिवेशनास राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी व शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षक संघाचे सैनिक वाघासारखे असून त्यांनी ताठमानेने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभे रहावे. संघ कार्यकारिणीने शिक्षकांचे हित जोपासण्यासाठी प्रयत्न करावे. सर्वांनी एकसंघ राहून संघाची शान राखावी.

युवराज पवार, संघटनेचे नेते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com