अबब.. घराजवळ निघाला नऊ फुटाचा अजगर आणि..

अबब.. घराजवळ निघाला नऊ फुटाचा अजगर आणि..

नांदगाव। Nandgaon (प्रतिनिधी)

नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील घराजवळ बुधवारी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास आठ ते नऊ फूट लांबी अजगर जात असतांना आढळून आल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली.

सर्पमित्र विजय बडोदे यांनी घटनास्थळी पोहचून नऊ फूट लांबीचा अजगर बिनविषारी सर्पाला शिताफीने पकडले. नांदगाव तालुक्यात अजगर दुसऱ्यांदा आढळून आला आहे.

नांदगाव तालुक्यातील येथील मारुती आनंदा तांबे यांच्या घराजवळ बुधवारी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळ रस्त्यावरून जात असताना मयूर काकळीज यांना नऊ फूट लांबीचा अजगर जातीचा सर्प आढळून आल्याने नागरिकांची एकच घबराट उडाली.

तांबे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना पाचारण करण्यात आले. बडोदे यांनी मोठ्या शिताफीने अजगर जातीच्या सर्पाला पकडले. सर्पाची वनविभागात नोंदणी केल्यानंतर जंगलात सोडून देण्यात आले

दरम्यान, नांदगाव तालुक्यात अजगर सर्प दुसऱ्यांदा आढळून आला यापूर्वी गिरणा धरणा जवळील मळगांव येथे आढळून आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com