राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा : आ. बोरसे

राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा : आ. बोरसे

मुंजवाड । वार्ताहर Munjvad

बागलाण तालुक्याचा Baglan Taluka विकासात्मक कायापालट Developmental transformation होण्यासाठी राजकीय हेवेदावे बाजुला ठेवत सर्वांनी एकत्र येणे काळाजी गरज बनली आहे. सर्वांची शक्ती पणास लागल्यास बागलाण विकासाचे शिखर गाठेल, असा विश्वास आ. दिलीप बोरसे MLA Dilip Borse यांनी येथे बोलतांना व्यक्त केला.

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व विरगाव Taharabad & Virgaon गटातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना आदी 22 कोटी रुपये निधीतून साकारण्यात येणार्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ आ. दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण पं.स. च्या प्रभारी सभापती ज्योती अहिरे, ताहाराबाद सरपंच शीतल नंदन, पिंपळकोठे सरपंच किशोर भामरे, अंतापूरचे सरपंच सुनील गवळी, विरगाव सरपंच ज्ञांनेश्वर देवरे, विंचुरेच्या सरपंच मिना बोरसे, चौंधणे सरपंच लीला मोरे, सरपंच नरकोळ जाखोड सरपंच शानुबाई पवार, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश देवरे, संजय मोरे, ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी नितीन देशमुख. रघुनाथ सुर्यवंशी, दिलीप आहिरे उपस्थित होते.

तालुक्याचा कायापालट करण्यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट करत आ. दिलीप बोरसे पुढे म्हणाले, प्रत्येक गावात विकास योजना पोचविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. सर्वांनी करोना लसीकरण घेत तालुका करोनामुक्त करावा, असे अवाहन त्यांनी शेवटी बोलतांना केले. याप्रसंगी आ. बोरसे यांचा ग्रामस्थांतर्फ सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला गुलाब पवार, कैलास पवार, ग्रामसेविका पुष्पा भामरे, केरसाणेचे ग्रामसेवक प्रविण सावंत, पांडुरंग सोनवणे, सुरेश सोनवणे, पोलिस पाटील उध्दव सोनवणे आदिंसह ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.

ताहाराबाद, पिंपळकोठे, कातरवेल, भिलवड, वडाखेल, शेवरे, माळीवाडे, बोराटे, हातनूर, जमोटी, अंतापूर, नरकोळ, विंचूरे, वटार, विरगाव, आव्हाटी, वनोली, औदाणे, तीळवण येथे स्थानिक निधी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना, जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत इमारत, अंतर्गत रस्ते काँक्रिटिकरण, स्मशानभूमी अनुषंगिक कामे, पूल व रस्त्याच्या 22 कोटी रुपयांच्या कामांचा आ. बोरसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला

Related Stories

No stories found.