
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले होते. तसेच पोलिस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला होता. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात होती...
यानंतर मंदिर प्रशासन आणि ब्राम्हण महासंघाने त्र्यंबकेश्वर पोलिसांना (Trimbakeshwar Police) पत्र लिहून याप्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील ब्राह्मण महासंघाने दिला होता. तर राज्य सरकारने सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अशातच आता या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी तपास करत याप्रकरणी ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर दुसरीकडे आज सकल हिंदू समाजाने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण (purification ) करत मंदिरात मंत्रपठण व आरती केली.
दरम्यान, यावेळी ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे, आचार्य तुषार भोसले, गजू घोडके, अनिकेत शास्त्री देशपांडे, राजेश दीक्षित, मयुरेश दीक्षित, बाळासाहेब पाठक, अभिषेक कडलग, किरण देशमुख, रोहित वारुंगसे, सतीश शुक्ल, डॉ. दिलीप जोशी, मनोज कान्नव यांच्यासह आदी उपस्थित होते.