६६ हजार क्विंटल कापूस खरेदी
नाशिक

६६ हजार क्विंटल कापूस खरेदी

जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांची माहिती

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या कापसाला हमी भाव मिळवून देण्यासाठी मालेगांव येथे सुरू करण्यात आलेल्या व जिल्ह्यातील एकमेव कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील एक हजार ९२९ शेतकर्‍यांच्या ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली.

खाजगी व्यापार्‍यांकडून कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने शेतकर्‍यांच्या कापसाला हमी भाव देण्यासाठी शासनाने मालेगांव येथील युनायटेड कॉटन एक्सट्रॅाट लिमिटेड (चाळीसगांव फाटा) येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात केले.त्यामुळे शेतकर्‍यांची सोय झाली व या कापूस खरेदी केंद्राचा लाभ मालेगांव, नांदगाव आणि येवला तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना झाला आहे, असेही बलसाने यांनी सांगितले.

करोना संसर्गाच्या प्रादुर्भावाअगोदर १ हजार २२१ शेतककर्‍यांकडून ३९ हजार ६३० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. करोनाच्या काळातही अनलॉक होती कापूस विक्री त्यामुळे ७०८ शेतकर्‍यांकडून २६ हजार ८३७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अशी एकूण १ हजार ९२९ शेतकर्‍यांकडून ६६ हजार ४६७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांच्या कापसाला प्रतवारीनुसार हमी भाव दिल्यामुळे शेतकर्‍यांना एक दिलासा मिळाला आहे. गाठी तयार करणार कापूस खरेदीसाठी एकूण १ हजार ३६४ शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून १३९ शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करणे अजून शिल्लक आहे. खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रिया करुन त्याच्या गाठी तयार केले जात असल्याचेही बलसाने यांनी सांगितले.

लक्षणीय :-

करोना काळातही अनलॉक होती पांढर्‍या सोन्याची विक्री.

नाशिक जिल्ह्यात एक हजार ९२९ शेतकर्‍यांच्या ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी.

कापूस खरेदी केंद्राचा मालेगाव, नांदगाव आणि येवला तालुक्यांना लाभ.

लॉकडाऊन काळात ७०८ शेतकर्‍यांकडून २६ हजार ८३७ क्विंटल कापसाची खरेदी.

शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रिया करुन त्याच्या गाठी तयार करणार

कापूस खरेदीसाठी १ हजार ३६४ शेतकर्‍यांची नोंदणी.

शिल्लक १३९ शेतकर्‍यांनी आपला कापूस विक्रीसाठी कापूस केंद्रात आणण्याचे आवाहन.

Deshdoot
www.deshdoot.com