मालेगाव येथून ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी

सहकार उपनिबंधक गौतम बलसाने यांची माहिती
मालेगाव येथून ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी
कापूस

नाशिक । Nashik

पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळवून देण्यासाठी मालेगांव येथे सुरू करण्यात आलेल्या व जिल्ह्यातील एकमेव कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील एक हजार ९२९ शेतकऱ्यांच्या ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली आहे.

यासंदर्भात जिल्हा माहिती कार्यालयास माहिती देताना उपनिबंधक श्री. बलसाने म्हणाले, खाजगी व्यापारांकडून कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांच्या कापसला हमी भाव देण्यासाठी शासनाने मालेगांव येथील युनायटेड कॉटण एक्सट्रॅाट लिमिटेड (चाळीसगांव फाटा) येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात केले. त्यामुळे शेतकऱ्यांची सोय झाली व या कापूस खरेदी केंद्राचा लाभ मालेगांव, नांदगाव आणि येवला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना झाला आहे, असेही श्री.बलसाने यांनी सांगितले.

करोना संसर्गाच्या प्रादुर्भावा अगोदर १ हजार २२१ शेतककऱ्यांकडून ३९ हजार ६३० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. कोरोनाच्या काळातही अनलॉक होती कापूस विक्री त्यामुळे ७०८ शेतकऱ्यांकडून २६ हजार ८३७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अशी एकूण १ हजार ९२९ शेतकऱ्यांकडून ६६ हजार ४६७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला प्रतवारीनुसार हमी भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला असल्याचे श्री. बलसाने यांनी सांगितले.

कापसाच्या गाठी तयार करणार

कापूस खरेदीसाठी एकूण १ हजार ३६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून १३९ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे अजून शिल्लक आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापसावर कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून प्रक्रिया करुन त्याच्या गाठी तयार केले जात असल्याचेही श्री. बलसाने यांनी सांगितले.

उर्वरीत शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणण्याचे आवाहन

कापुस खरेदी केंद्रात आजही कापसाची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे मालेगांव, नांदगाव आणि येवला तालुक्यातील शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन उपनिबंधक गौतम बलसाने यांनी केले आहे.

लक्षणीय :

करोना काळातही होती अनलॉक होती पांढऱ्या सोन्याची विक्री.

◼ नाशिक जिल्ह्यात एक हजार ९२९ शेतकऱ्यांच्या ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी.

◼ कापूस खरेदी केंद्राचा मालेगाव, नांदगाव आणि येवला तालुक्यांना लाभ.

◼ लॉकडाऊन काळात ७०८ शेतकऱ्यांकडून २६ हजार ८३७ क्विंटल कापसाची खरेदी.

◼ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रिया करुन त्याच्या गाठी तयार करणार

◼ कापूस खरेदीसाठी १ हजार ३६४ शेतकऱ्यांची नोंदणी.

◼ शिल्लक १३९ शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी कापूस केंद्रात आणण्याचे आवाहन.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com