मनपाची दंडात्मक कारवाई

मनपाची दंडात्मक कारवाई

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik

विनामास्क Without Mask फिरणार्‍या नागरिक तसेच प्लास्टिक Plastic बाळगणार्‍या दुकानदारांवरील कारवाईला दिवाळीनंतर महापालिकेने वेग दिला आहे. 10 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत पालिकेच्या घनकचरा विभागाने 44 हजार 500 रुपये दंड वसूल केला.

आयुक्त कैलास जाधव यांच्या आदेशान्वये नाशिकरोड विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड, जेलरोड परिसरात मोहिम राबविण्यात आली. मास्क न वापरणार्‍या 35 नागरिकांना प्रत्येकी पाचशे रुपयाप्रमाणे 17,500 दंड करण्यात आला,

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी दोन प्रकरणांत दोन हजार रुपये आणि प्लास्टिक वापरणार्‍या पाच दुकानदारांना प्रत्येकी पाच हजाराप्रमाणे 25 हजार असा 44 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत राजु निरभवणे, ज्ञानेश्वर भोसले, विजय जाधव, प्रविण बिर्‍हाडे, सागर बारगळ, प्रवीण मारू, जनार्धन घंटे आदी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com