ग्रामपंचायतीकडून नियम न पाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई
करोना

ग्रामपंचायतीकडून नियम न पाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

कसबे सुकेणे । वार्ताहर Kasbe Sukene

निफाड तालुक्यात (niphad taluka) करोनाचा (corona) प्रादूर्भाव वाढत असून जिल्ह्यासह तालुक्यात करोनाची तिसरी लाट (third wave of Corona) सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला करोना नियमावली (Corona Rules) पाळण्याचे कडक आदेश दिल्याने कसबे सुकेणे ग्रामपालिका (Kasbe Sukene Grampalika) अ‍ॅक्शन मोडमध्ये आली असून करोनाचे नियम न पाळणार्‍यांवर दंडात्मक कार्यवाही (Punitive action) केली जात आहे.

सध्या करोना बरोबरच ओमायक्रॉन (omicron) विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी मास्क (mask) हे प्रभावी साधन असल्याने शासनाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. परंतु अद्यापही काही नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपालिकेने याबाबत गावात दोन दिवस जनजागृती केल्यानंतर आता दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.

ग्रामपालिकेच्या मासिक सभेत करोना नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याविषयी निर्णय घेण्यात आला. कसबे सुकेणे परिसरातील जनतेसह सर्व आस्थापने, व्यवसायिक, उद्योजक, छोटे-मोठे टपरी धारक यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपालिका प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनराज भंडारे, ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे व ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मास्क न लावणे, सुरक्षित अंतर न राखणे, गटागटाने उभे राहणे असे प्रकार दिसून आल्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून विचारणा करण्यात येत आहे. याशिवाय लसीकरणावर भर देण्यासाठी प्रयत्न करणे, प्रथम व द्वितीय डोस पूर्ण करण्यावर भर देणे. तसेच पंधरा वर्ष पुढील युवकांचे 100 टक्के लसीकरण करून घेण्यावर भर देणे, वाड्या-वस्त्यांवर पोहोचून लसीकरण करून घेणे, उपचाराविना कोणीही वंचित राहू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्राथमिकता दिली जात आहे. तसेच ग्रामपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी गावात फिरून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करू लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com