
नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad
रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिसांच्या (Police) वतीने हेल्मेट (Helmet) न घालणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाईला आज सुरुवात करण्यात आली...
आज सकाळपासून सुरु झालेल्या मोहिमेत आतापर्यंत नाशिकरोड परिसरातील 113 वाहनचालकांकडून दहा हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रस्त्यावरील वाढते अपघात (Accident) रोखण्यासाठी पोलिसांनी दंड न भरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध आजपासून मोहीम सुरू केली. नाशिक रोड परिसरातील बिटको कॉलेज समोर व बिटको चौक येथील वाहतूक सिग्नल जवळ शहर वाहतूक शाखेचे नाशिकरोड विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, हवालदार प्रकाश आरोटे, जाधव, थोरात, सांगळे आदींनी ही मोहीम राबविली.
आतापर्यंत 113 वाहन चालकांकडून सुमारे दहा हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला तर काही वाहन चालकांनी मर्यादित वेळेत दंड न भरल्यास काही दिवसानंतर त्यांच्यावर कोर्टात खटला पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, नाशिकरोड परिसरात अनेक वाहनचालक हेल्मेट परिधान करताना दिसून आले तर दंड वसुलीच्या ठिकाणी वाहनचालक व पोलीस यांच्यात किरकोळ वादही झाल्याचा प्रकार घडला.