देवळालीत विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

देवळालीत विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

देवळाली कॅम्प | Deolali

नाशिक जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहीर नोटीस प्रमाणे देवळाली कॅम्प शहरात देखील विनामास्क फिरणाऱ्या नागरिक व व्यावसायिकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यात ५ नागरिकांवर कारवाई करण्यात येऊन प्रत्येकाकडून १ हजार रु.दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक शहरापाठोपाठदेवळालीतही रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. कोविड १९ आजाराचे रुग्ण वाढ होऊ नये याकरिता शासनाने नियमित मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. संसर्गजन्य आजार फैलावु नये म्हणून नागरिकांनीमास्क वापरणे आवश्यक असतांना अनेक नागरिक शहरात विनामास्क फिरत आहे. याबाबत प्रशासनाने आता पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. काल सोमवार दि.१५ रोजी शहरातील गजबज असलेल्या लेव्हीट मार्केट, हौसन रोड,वडनेर रोड या भागात नागरिकांसह दुकानदारांवर थेट कारवाई करणे सुरु झाले आहे. यामध्ये विनमस्क आढळलेल्यावर प्रशासनाचे आरोग्य विभाग अधिक्षक राजिंदरसिंह ठाकूर, सहाय्यक आरोग्य निरीक्षक अमन गुप्ता, जितेश सिंघानिया पोलिस प्रशासनाचे एन.बी.मोरे, सुभाष जाधव, कुणाल घोरपडे,एकनाथ बागुल आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com