सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

नियंत्रणात आलेल्या करोना विषाणूचा प्रसार पुन्हा वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे विनामास्क फिरणार्यांवर सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सिन्नर शहरातील करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर नगरपरिषद व सिन्नर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. रस्त्यावर विना मास्क फिरताना आढळून आलेल्या नागरिकांकडून प्रति व्यक्ती 100 ते 200 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

दुचाकीवर विनामास्क डबल, ट्रिपल सिट, चारचाकी गाडीमध्ये 3 पेक्षा जास्त प्रवासी विनामास्क आढळून आल्यास अशांनाही दंड आकारण्यात आला. कारवाईत पहिल्याच दिवशी सुमारे 2100 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. उपमुख्याधिकारी रोहित पगार, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, अर्जुन भोळे, तुषार लोखंडे, दीपक भाटजिरे, जगदीश वांद्रे, निवृत्ती चव्हाण, सिन्नर पोलीस ठाणेचे पोलीस कॉन्स्टेबल समाधान बोराडे, नितीन गाढवे, अमोल गोडे यांच्या संयुक्त पथकाने ही कार्यवाही केली.