नाशिक । प्रतिनिधी

शहरात पुन्हा एकदा करोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शहरातील ठिकठिकाणच्या गर्दी होणार्या स्थळांची तपासणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (दि.20) शहरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेमिनारमध्ये मास्क न वापरल्याबंद्दल 7 डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे डॉक्टर तुम्ही सुध्दा असे म्हणण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.

महापालिकेकडुन शहरात गर्दीच्या ठिकाणी व हॉटेल, मंगल कायर्ांलयांची तपासणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर एका पथकाने शहरातील गंजमाळ भागातील एका हॉटेल मध्ये वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञांचे सेमिनारची तपासणी केली.

याठिकाणी काही डॉक्टर विना मास्क असल्याचे पथकाला आढळून आले. महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील पथकाने पाहणी करून तेथील 7 डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई केली. पथकाने त्यांच्याकडुन 1400 रुपयांचा दंड वसूल केला.

करोनानासंदर्भात काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयात विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाचे काम म्हणजे आपआपल्या विभागात गर्दी होणार्या स्थळांकडे नजर ठेवणे. मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, या बाबी पाहून यातील त्रुटी आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक पथक आपआपल्या विभागात कार्यान्वित झाले आहे.