नियम न पाळल्याने व्यावसायिकावर कारवाई

पोलीस व मनपा प्रशासनाची कारवाई
नियम न पाळल्याने व्यावसायिकावर कारवाई

नवीन नाशिक |प्रतिनिधी

सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडविणाऱ्या खुटवड नगर येथील एका स्वीट्स च्या दुकानावर दंडात्मक कारवाई करून काही काळाकरता दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

खुटवड नगर परिसरातील पौर्णिमा स्विट चालकाला अंबड ठाणे व मनपाच्या वतीने वारंवार समज देऊन देखील सोशल डिस्टनचा फंज्जा उडवित असल्याचे चित्र दिसून आले. मनपाने या स्विट चालकावर दोन वेळेस दंडात्मक कारवाई केली असतांना देखील बुधवारी या ठिकाणी सोशल डिस्टनसच्या नियमांच उल्लंघन करतांना दिसून आले.

एकीकडे करोनाचा उद्रेक वाढत आहे. नाशिकच्या विविध संघटनांनी एकत्रित येऊन जनता कर्म्युला गेले दोन दिवसांपासून प्रतिसाद मिळत आहे. पण या स्वीट चालवणाऱ्या मालकाला याचा विसर पडला की काय ? असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. शेवटी अंबड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव तसेच महानगरपालिकेचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी आपल्या टीमसह कारवाईला गेले असता, स्वीट मालकाने हुज्जत घातली व या स्वीट मालकाला सुमारे ५००० रुपयाची दंडात्मक कारवाई करून हे स्वीटचे दुकान काही काळ बंद करणे भाग पडले.

यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे अंमलदार शांताराम शेळके व त्यांचे कर्मचारी तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता मुकादम विजय गोगलीया , अजय खळगे , विनोद बोरीसा , विशाल आवारे उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com