पॉर्न वेबसाईटवर महिलांचे फोटो टाकणाऱ्याला सुनावली शिक्षा

पॉर्न वेबसाईटवर महिलांचे फोटो टाकणाऱ्याला सुनावली शिक्षा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करत महिलांचे अश्लील फोटो (Pornographic photos of women )काढून पॉर्न वेबसाईटवर (porn website )प्रसिद्ध करणाऱ्याला न्यायालयाने आरोपी ठरवत साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,संशयित अक्षय श्रीपाद राव (२८,शिवायतन बंगलो,खोडे नगर,आठवण हॉटेल जवळ,विधाते नगर,इंदिरानगर,नाशिक ) याने पिडीत तरुणीसोबत मैत्री करत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक अश्लील चाळे करत मोबाईल मध्ये विवस्त्र फोटो काढून तिचा विनयभंग केला.

तसेच तिचे फोटो पॉर्न वेबसाईटवर टाकून प्रसारित करून तिची बदनामी केली. असाच प्रकार अक्षय याने दुसऱ्या तरुणीसोबत देखील केला. यावरून पिडीत तरुणींनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे नाशिक अनिल पवार (सध्या नेमणूक वाडीवऱ्हे पोलीस ठाणे ) यांनी करत संशयीताविरोधात सबळ पुरावे गोळा करून गुन्हा साबित होण्याच्या दृष्टीने मुख्य न्यायदंडाधिकारी नाशिक येथे दोषारोपपत्र सादर केले होते.

या गुन्ह्यात सबळ पुरावे,फिर्यादी,साक्षीदार,पंच यांनी दिलेली साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायमूर्ती व्ही.एल.भोसले यांनी आरोपी अक्षय राव यास साडेतीन वर्षे सश्रम कारावास व तिन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.यामध्ये भादवी ३५४(अ)मधे ६ महिने सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंड,भादवी ३५४(क)मधे १ वर्षे सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंड,माहिती तंत्रज्ञान २००० चे कलम ६७ मध्ये १ वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंड,व माहिती तंत्रज्ञान २००० चे कलम ६७ (अ) मध्ये १ वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून सुधीर सपकाळे यांनी काम बघितले.कोर्टअंमलदार म्हणून आर.एच.खकाळे,जी.ए.गायकवाड यांनी सदर गुन्ह्यात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला.

Related Stories

No stories found.