नाशिक | प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्या विभागात प्रवेश मिळाला आहे तेथेच शिक्षण घेता येईल, इतर विभागातील आवडता विषय शिकता येणार नाही, अशा नियमांच्या भिंतीचा अडसर दूर होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ अभ्यासक्रमासह इतर पूरक विषय देखील शिकता येतील, त्यादृष्टीने वेळापत्रकाची रचनाही केली जाईल. विद्यापीठात 'स्कूल सिस्टिम' विकसित करण्यात आले आहे...

देशातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये 'स्कूल सिस्टिम'ने शिक्षण देण्याची पद्धत आहे. पुणे विद्यापीठात 'स्कूल सिस्टिम' असावी अशी सूचना 'नॅक'तर्फे करण्यात आली होती.

त्यानुसार गेल्या महिन्यांपासून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी याचे नियोजन करून, स्कूलची निर्मिती केली आहे.

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी याबाबत आदेश काढले आहेत. यात ५२ विभाग, अध्यासन केंद्र व अभ्यास केंद्र निहाय १८ स्कूल स्थापन करून प्रत्येक स्कुलसाठी एका संचालकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

उद्देश :

- समान अभ्यासक्रम, मूलभूत ज्ञान सारखे असणारे विषय एकत्र शिकवणे

- मनुष्यबळ, भांडवल आणि निधीचा योग्य वापर, पुर्नखर्च टाळणे

- केवळ एकाच विभागाचा विचार न करता 'स्कूल'मधील सहभागी सर्व विभागांचा विचार करून धोरण निर्णय

स्कूलचे फायदे :

- स्कूलमधील समाविष्ट विभागांच्या सहकार्याने संशोधनास गती येईल

- च्वाइस बेस क्रेडिट सिस्टीमनुसार विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळेल.

- आंतरराष्ट्रीय संस्थांशी करार करताना स्कूल सिस्टिम असणे फायदेशीर