नाशिक | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा पदवी प्रदान समारंभ यंदा मार्च-एप्रिल २०२१ मध्ये होणे अपेक्षित आहे. ११८ व्या पदवीप्रदान समारंभासाठी पदवी आणि पदविका प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्जाचा नमुना, शुल्क इत्यादीबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यापीठाचे पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज योग्य शुल्कसह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकितप्रत संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याबाबतचा तपशील :

- नियमित शुल्कासह : १५ जानेवारी २०२१ पर्यंत

- विलंब शुल्कासह : १६ ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत