पाळीव प्राण्यांसाठी पुणे पॅटर्न?

पाळीव प्राण्यांसाठी पुणे पॅटर्न?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पाळीव प्राणी (pets)जसे कुत्रा आदींनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यावर मालकाला दंड करण्याबरोबरच घरात जर मांजर ( Cat) पाळायची असेल तर त्यासाठी महापालिकेची परवानगी लागणार, असे काही निर्णय राज्यातील पुणे महापालिकेने नुकतेच घेतले आहेत. नाशिक महापालिकादेखील ‘पुणे पॅटर्न’ राबवण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

सध्या मनपा आयुक्त देशाबाहेर असल्यामुळे आयुक्ता आल्यावर चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान नाशिक महापालिका पुणे महापालिकेशी संपर्क करून कायद्यासंदर्भातील माहिती घेणार आहे. पुणे पॅटर्न लागू झाल्यास नाशिकमध्येही मांजर पाळ्ण्यासाठी पालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे.

सध्या नाशिक महापालिकेकडून घरात पाळीव कुत्रे पाळ्ण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. यासाठी अडीचशे रुपये अदा करावे लागतात. मात्र, आता पालिकेने मांजर पाळण्यासाठीही परवानगी आवश्यक केल्यास पाळीव प्राण्यांसाठी परवाना घ्यावा लागणार आहे. दरम्यान शहरातील काही जनांकडे एकापेक्षा अधिक मांजर पाळल्या जातात.

अनेकदा मांजरीमुळे शेजारच्यांमध्ये वादाचे प्रकार घडतात. त्यामुळे पुणे महापालिकेप्रमाणेच नाशकातही कुत्र्याप्रमाणे पाळीव मांजराची महापालिकेकडे नोंदणी करणे बंधनकारक करावी. अशी मागणी केली जात आहे. नाशिक महापालिकेच्या पशु वैद्यकिय विभागाकडून मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी खर्च करतेय. मोकाट जनावरांवर देखील असाच खर्च केला जातोय.

दरम्यान नाशिक महापालिका हद्दीत किती जणांकडे पाळीव कुत्रे आहेत याची नोंद ठेवण्याचे काम पशु वैद्यकिय विभागाचे आहे. परंतु अशा प्रकारची माहिती या विभागाकडे नसल्याचे समजते. आतापर्यत 2,100 पाळीव कुत्र्यांची नोंदणी पालिकेकडे करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com