पुनदचे पाणी सटाण्यात दाखल; एप्रिल महिन्यापासून पाणीपुरवठा होणार सुरळीत

पुनदचे पाणी सटाण्यात दाखल; एप्रिल महिन्यापासून पाणीपुरवठा होणार सुरळीत

नाशिक | प्रतिनिधी

सटाणा शहराला नवसंजीवनी ठरणारे पुनद पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे काम पूर्णत्वाकडे आहे. नुकतेच पुनदपासून सटाणा शहरापर्यंत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनद्वारे शहरातील आराम नदीनजीक आज पहिले पाण्याचे ट्रायल यशस्वी झाले. पाणी सटाणा शहरात दाखल झाल्यामुळे सटाणा शहरवासियांनी आनंद व्यक्त केला आहे...

पुढील महिनाभराच्या कामाअंती सटाणा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून होणारी पाणीबाणी अखेर थांबण्यास मदत होणार आहे. मार्च, एप्रिल आणि मे मधील दुष्काळ सटाणा शहरवासीयांच्या जणू पाचवीलाच पुजलेला असे. तीन, सहा नंतर बारा दिवसांनी एकदा पाणीपुरवठा झालेला शहराने पहिला आहे.

मात्र आता पुनद धरणाचे पाणी पाईपलाईनद्रवारे सटाणा शहरात आणले जात आहे. आजच या पाईपलाईनमधून सटाणा शहराच्या वेशीवरील आराम नदीपात्रानजिक पाणी काढण्यात आले. यावेळी उच्च दाबामध्ये हे पाणी आराम नदीपात्रात पडले. पुढील महिनाभरात शहरातून हे पाणी इच्छितस्थळी पोहोचवले जाणार आहे.

असा उभारला सटाण्यातील पाण्याचा लढा

नाशिकमधील वकील रोशन सोनवणे यांनी सटाण्यातील पिण्याच्या पाण्याबाबत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. यामध्ये कळवण तालुक्यासह इतर गावातील नागरिक पाण्याच्या पाईपलाईनला कशाप्रकारे विरोध करतात. तसेच सत्यपरिस्थिती काय आहे? जर पाणी नदीने आणले तर किती तोटा होईल याबाबतची सर्व माहिती या याचिकेत देण्यात आली होती. सरकारी पक्ष, नगरपरिषद प्रशासन यांनीदेखील उच्च न्यायालयात बाजू मांडत तत्थ्य सांगितले होते. यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्यामुळे त्वरित याचिकेवर सुनावणी करत सटाणा वासियांना दिलासा दिला होता.

कळवणने दिले होते उच्च न्यायलयात आव्हान

या याचिकेला आव्हान देणारी याची कळवणच्या जनतेने उच्च न्यायालयात दाखल केली होती. दरम्यान, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्यामुळे ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळत पाण्याच्या पाईपलाईनचे काम ३१ मार्च २०२१ पूर्वी करण्याचे आदेश काढले होते.

त्यानंतर प्रत्यक्षात पाईपलाईन टाकण्यासाठी सुरुवात झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून हे काम सुरुवातील पोलीस बंदोबस्तात सुरु झाले. यानंतर विरोध मावळत जाऊन आज हे काम पूर्णत्वाकडे आलेले दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com