'रुमण्याचा मानकरी' काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न : भुजबळ

'रुमण्याचा मानकरी' काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न : भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बदलत्या काळानुसार कृषी संस्कृतीतल्या जुन्या स्मृती त्यांनी विस्मृतीत न टाकता त्यांना उजाळा दिला आहे. विविध विषयाची मांडणी करणारा हा काव्य संग्रह (Poetry collection) ग्रामीण जीवनाच्या चरित्राचा भाग वाखाणण्याजोगा आहे....

'रुमण्याचा मानकरी' (Rumanyacha Mankari) काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे (Rural culture) वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

मु. श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे कवी जी. पी. खैरनार (G. P. Khairnar) लिखित 'रुमण्याचा मानकरी' या काव्य संग्रहाचे प्रकाशन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर (Balasaheb Kshirsagar), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod), प्रकाशक विलास पोतदार, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, पोपटराव खैरनार, जिजाबाई खैरनार, सुनीता खैरनार, पांडुरंग खैरनार, मकरंद सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की, येवला तालुक्यातील (Yeola Taluka) नगरसूल (Nagarsul) येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले जी. पी. खैरनार यांनी आपले शिक्षण (Education) पूर्ण केले. सध्या ते जिल्हा परिषद (Zilla Parishad) नाशिक येथे औषध निर्माण अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

जिल्हा परिषदेत आपले कर्तव्य बजावताना त्यांनी आपली वाचन (Reading) आणि लेखनाची (Writing) आवड जोपासली असून त्यांचा 'रुमण्याचा मानकरी' हा तिसरा कविता संग्रह आज प्रकाशित होत आहे.

आज प्रकाशित होणारे त्यांचे तिसरे काव्य संग्रह व पाचवे पुस्तक आहे. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ग्रामीण जीवन तेथील घटना, निसर्ग, शेतीपूरक व्यवसाय, गाय, बैल, म्हैस पाळीव प्राणी यांच्यावर आधारित वास्तव कवितांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, रुमण्याचा मानकरी हा त्यांचा ५२ कवितांचा तिसरा काव्यसंग्रह असून यामध्ये कृषी, करोना, मायबाप, मूल्य संस्कृती, सणोत्सव, व्यक्तीचित्रण, कुटुंब, प्राणी पक्षी आदी संबंधीच्या कवितांचा समावेश आहे.

या कविता संग्रहातील ५२ कवितांची शब्दकळा साधी, सोपी आणि सुगम आहे. कवितांची मांडणी अगदी सहज सोप्या भाषेत केल्याने त्या वाचनीय ठरतात. फुले दाम्पत्य, अनाथांची माय यासह लिहिलेल्या विविध कविता समाजाच्या परिवर्तनास उपयोगी ठरतील.

'रुमण्याचा मानकरी' काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न : भुजबळ
Visual Story : मोस्ट अवेटेड 'KGF Chapter 2' चे गाणे 'या' दिवशी होणार रिलीज

नाशिकला कला क्रीडा क्षेत्रात अतिशय मोठी परंपरा लाभली आहे. वसंत कानेटकर (Vasant Kanetkar) या भूमीतुन पुढे आले त्यांचे साहित्य नाटकं अतिशय लोकप्रिय ठरली. काशिनाथ घाणेकर यांनी भूमिका केलेले हे नाटके बघण्याच भाग्य मला लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.

'रुमण्याचा मानकरी' काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न : भुजबळ
Photo Gallery : रंगपंचमीसाठी नाशिककर सज्ज; दोन वर्षानंतर रहाडीत मनसोक्त रंगण्याची मोकळीक

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि लेखक जी. पी. खैरनार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com