
नाशिक | प्रतिनिधी Nashik
'मविप्रचे शिल्पकार ॲड. बाबुराव ठाकरे' ('MVP Che Shilpkar Adv. Baburao Thackeray) या विशेष पुस्तकाचे प्रकाशन खा.शरद पवार ( MP Sharad Pawar ) यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
या पुस्तकात बाबुराव ठाकरे यांचे मविप्र साठीचे योगदान व त्यांनी केलेले कार्य तसेच सोबतच्या आठवणी याचा मागोवा तीस लेखकांनी शब्दातून मांडला आहे. प्रकाशननंतर खा. पवार यांनी कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत पुस्तकाचे कौतुक केले.सदर पुस्तकाचे संपादन बाळासाहेब गुंजाळ यांनी केले आहे.
हॉटेल एम्रल्ड पार्क येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात माजीमंत्री छगन भुजबळ, मविप्रचे माजी सभापती नितीन ठाकरे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे,आमदार माणिकराव कोकाटे, डॉ.सयाजीराव गायकवाड,बाळासाहेब क्षीरसागर,डॉ. अशोक पिंगळे, विक्रांत मते, आमदार दिलीप बनकर,अंबादास बनकर, लक्ष्मीकांत कोकाटे,राजेंद्र डोखळे, मनीष लोणारी,सुरेखा बोराडे, मदन पवार, बाबुराव तांबे, रमेश पिंगळे आदींसह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.