लोकोपयोगी कामे गरजेचे : वाजे

सोनांबेत विविध विकासकामांचे भुमीपूजन
लोकोपयोगी कामे गरजेचे : वाजे

सिन्नर । वार्ताहर Sinnar

ग्रामीण भागात मुलभुत कामांना प्राधान्य असले तरी लोकोपयोगी कामे करणे गरजेचे असते. यासाठी ग्रामस्थांनीही एकत्र येत कामांना चालना दिली पाहिजे. त्यातून लवकरात लवकर कामे मार्गी लागण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे (former mla rajabhau vaje) यांनी केले.

तालुक्यातील सोनांबे येथे सभामंडपाचे लोकार्पण (Dedication of Sabhamandap) व विविध विकास कामांचे (development works) भूमिपूजन (bhumipujan) वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सोनांबेत सर्वांनी एकत्र येत अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. यापुढील काळातही गावातील प्रलंबित कामांचा पाठपुरावा करुन ती मार्गी लावण्याचे आवाहन राजाभाऊंनी केले. डगळे वस्ती येथे ठक्करबाप्पा योजनेतून खासदार निधी (MP fund) अंतर्गत आकर्षक सभामंडप बांधण्यात आला आहे.

तसेच जिल्हा परिषद सदस्या वनीता शिंदे (Zilla Parishad member Vanita Shinde) यांच्या निधीतून शिवरस्ता, पंचायत समिती सदस्य वेणू डावरे यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) परिसर काँक्रिटीकरण (Concretization), स्मशानभूमी सुशोभीकरण (Cemetery beautification),

15 व्या वित्त आयोगातून (Finance Commission) भूमिगत गटार (Underground sewers), 15 व्या वित्त आयोगातून अंगणवाडीसाठी शौचालय, देवनदी रस्ता काँक्रिटीकरण, बोडके वस्ती ते चिका वस्ती पाईपलाईन, कचरा कुंड्यांची व्यवस्था, आदिवासी वस्तीवर भूमिगत गटार, गावांतर्गत भूमिगत गटार योजना, राजवाडा परिसरात पाईपलाईन, गावात नळ दुरुस्ती व पाइपलाईन, बेंदवाडी शाळेसाठी शेड, आरोग्य उपकेंद्राचे सुशोभीकरण,

अंगणवाडीसाठी एलईडी व तार कुंपणाची व्यवस्था, मागास वर्गीय परिसरात भूमिगत गटार योजना, रस्ता काँक्रिटीकरण, बसस्थानकाजवळ प्रसाधन गृहाची सुविधा या कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. दिव्यांगांना पाच टक्के निधीचे अनुदान वाटप यावेळी करण्यात आले. यावेळी वनप्रस्थ फाउंडेशनने शिवारातील आई-भवानी डोंगराजवळ दोन वर्ष श्रमदान करुन वननिर्मिती केल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांंचा गौरव करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, पंचायत समिती सभापती संगिता पावसे, उदय सांगळे, सरपंच डॉ. रविंद्र पवार, उपसरपंच रोहिणी डगळे, भारत कोकाटे, नामदेव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com