त्र्यंबकला कर्फ्यूमुळे भाविकांना पाणी देखील मिळाले नाही..!

जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद
त्र्यंबकला कर्फ्यूमुळे भाविकांना पाणी देखील मिळाले नाही..!

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक शहरातील जनता कर्फ्यूस नागरिकाकडून चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.

त्र्यंबक शहरासह तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने आजपासून जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. या पार्शभूमीवर शहरातील व्यावसायिकांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात सर्वकाही बंद होते. तसेच त्र्यंबक मंदिर देखील पुढील चार दिवसांसाठी बंद असल्याने शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला.

यावेळी माहिती नसल्याने अनेक भाविकांची तारांबळ उडाली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा हिरमोड झाला असून बंदमुळे पिण्याचे पाणीही त्यांना यावेळी मिळाले नाही. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांवर पोलिसांकडून बॅरिकेट लावण्यात आले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे.

दरम्या त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात कोणताही धोका नको म्हणून तपासणी व प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

दरम्यान श्री त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने मंदिर बंद असताना दरवाजाजवळ भाविकांना पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देण्याची गरज आहे

उद्या मंगळवारचा आठवडे बाजार भरणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्र्यंबक हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण जनता येथे दैनंदिन बाजारासाठी येत असते पण त्यांनाही बंद मुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी वंचित राहावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com