अवयवदान प्रोत्साहनासाठी जनजागृती अभियान
नाशिक

अवयवदान प्रोत्साहनासाठी जनजागृती अभियान

पुणे विद्यापीठाचे विद्यापीठांना निर्देश

Bharat Pagare

नाशिक | Nashik

अवयवदान व प्राेत्साहनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व रासेयो संलग्नित व स्वायत्त महाविद्यालये व परिसंस्थांना निर्देश दिले आहेत. यासाठी दि.१३ ते २० आॅगस्टपर्यंत जनजागृती अभियान आठवडा राबवावा, असेही कळविले आहे.

विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांमधून ६० हजार ७५० स्वयंसेवक व ५०० महाविद्यालये सहभागी आहेत. मूल्यशिक्षण कार्यशाळा, विशेष शिबिर व नियमित कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतात.

राज्यपालांच्या सचिवांनी पाठवलेल्या पत्रानुसार महाविद्यालयांच्या रासेयोकडून अवयवदान जागृती अभियान ऑनलाईन माध्यमातून करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. जनजागृती अभियान आठवड्यात विविध स्वरूपातील कार्यक्रमाची आखणी करून ती विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाजातील नागरीक यांच्या स्तरावर करण्यास सांगावे.

समाजमाध्यमांवर याबाबत उद्बोधन प्रबोधन करण्यात यावे. तसेच अवयवदानासाठी सरकारी संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावी. यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाजातील नागरीक यांच्या सहभागातून अवयवदान करण्याबाबतची शपथ घेण्यात यावी, असे कळविले आहे.

या सर्वांचा एकत्रित अहवाल राज्यपाल कार्यालयास पाठवला जाणार असून दि. १३ ते २० ऑगस्ट २०२० या दरम्यान अवयवदान प्रोत्साहन व जनजागृती अभियानबाबत केलेल्या उपक्रमांचा/कार्याचा अहवाल दि. २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत nss@unipune.ac.in या मेलवर आॅर्गन डाेनेशन अवेअरनेस या विषयासह पाठवावा, असे आवाहन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com