पथनाट्याद्वारे कर्करोगाबाबत जनजागृती

पथनाट्याद्वारे कर्करोगाबाबत जनजागृती

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

गुरुगोविंदसिंग तंत्रनिकेतन (Guru Gobind Singh Tannariketan)येथील रोटरॅक्ट क्लबतर्फे (Rotaract Club)राष्ट्रीय कर्करोग जागृती दिनानिमित्त (National Cancer Awareness Day) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

पथनाट्याद्वारे कर्करोगाची कारणे, लक्षणे व उपायांबाबत माहिती देण्यात आली. सदर पथनाट्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल उपस्थित नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.

उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष बलबीरसिंग छाब्रा व इतर सदस्यांनी कौतुक केले. तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्रीहरी उपासनी, विभागप्रमुख प्रा. सुषमा करंडे, प्रा. विलास दगाटे , प्रा . गायत्री जगताप , प्रा . स्वप्नील पाटील , प्रा . प्रशांत चव्हाण , प्रा . अशिता शांडिल्य , प्रा . सोनाली शास्त्री , चंदन पाटील यांनी मार्गदर्शन केले. क्लबचे समन्वयक प्रा . गणेश वाघ आणि क्लबचे विद्यार्थी प्रतिनिधी अनुराग पाटील , शुभम खैरनार , समृद्धी , सार्थक लोळगे, शरयू चव्हाणके , फरदीन शेख , रोहित खैरनार , आकांक्षा सुनवर आदींनी संयोजन केले .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com