थकीत कर असलेल्या वाहनांचा 'या' तारखेला होणार जाहीर लिलाव

थकीत कर असलेल्या वाहनांचा 'या' तारखेला होणार जाहीर लिलाव

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

मोटार वाहन कर (Motor vehicle tax) न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील (Motor Vehicle Act) विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या

14 वाहनांचा बुधवार दि.22 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक (Regional Transport Office, Nashik) येथे जाहीर ई-लिलाव (e-auction) करण्यात येणार आहे.

या ई-लिलावात (e-auction) सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी 20 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रदिप शिंदे (Regional Transport Officer, Pradeep Shinde) यांनी केले आहे. जाहीर ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी 15 ते 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत सकाळी 11ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे 20 हजार रूपये रक्कमेचा RTO, NASHIK या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) व एक हजार रूपये लिलाव शुल्कासह नाव नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. लिलाव करण्यात येणारी वाहने राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा (State Transport Corporation Workshop), पेठ रोड, नाशिक येथे पाहणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून या लिलाव प्रक्रियेत जीएसटी (GST) धारकांनाच सहभाग घेता येणार आहे.

वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखली अटकवून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांना कर अदा करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्‍त्यावर पोच देयक टपालाने नोटीस देण्यात आली आहे. या जाहीर ई-लिलावाच्या अटी व शर्ती 15 फेब्रुवारी 2023 पासून www.eauction.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com