पं. प्रभाकर दसककर कालवश

पं. प्रभाकर दसककर कालवश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंडीत प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर (वय 94) Pandit Prabhakar Govindshastri Dasakkar यांना आज दिनांक 10 रोजी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी देवाज्ञा झाली.

नाशिक मधील जेष्ठ संगीत शिक्षक Senior music teacher , तसेच वादक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी त्यांचे काका पं. एकनाथ दसककर यांच्याकडे ग्वाल्हेर घरण्याची तालीम ग्वाल्हेर व बासबरेली येथे राहून घेतली. त्यांना पं. राजाभाऊ पुछवाले यांचा प्रदीर्घ सहवास व मार्गदर्शन लाभले. सुरुवातापासून त्यांनी अनेक प्रख्यात किर्तनकारांना तसेच गायक, वादक कलाकारांना साथ संगत केली. त्यांनी काही काळ नाशिकच्या एका विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून कार्य केले.

तसेच अनेक विद्यार्थ्यांना संगीताची रुची व ज्ञान दिले. नाशिकमधील पहिले भजनीमंडळ सुरु करून अनेकांमध्ये संगतीविषयीची आस्था निर्माण केली. त्यांनी अनेक रचनांना विविध रागदारीत अद्वितीय चाली बांधल्या. त्यात प्रामुख्याने हरिपाठ व अनेक भजने, रागदारीत बंदिशी तराणे इत्यादीचा समावेश आहे. अतिशय लोकप्रिय व हसतमुख म्हणून गुरुजींची ओळख होती. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com