नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

एमपीएससी पूर्व परीक्षेची प्रोव्हिजनल उत्तरतालिका जाहीर झाली आहे. या उत्तरतालिकेतील प्रश्नोत्तरासंबंधी हरकत घेण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंतची मुदत आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतालिका पाहता येईल.

पेपर १ आणि २ ची उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. उमेदवारांना यातील कुठल्या प्रश्नोत्तरासंबंधी हरकत घ्यायची असेल तर आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या हरकतीच्या नमुन्यातर टपालाने आयोगाच्या पत्त्यावर हरकती पाठवायच्या आहेत.

हरकती पाठवण्याचा पत्ता आहे - सहसचिव व परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ५, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम, महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई - २१.

एमपीएससी पूर्व परीक्षा २०२० ही रविवारी २१ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी सुमारे दोन लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी नोदणी केली होती. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांत उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती.