जिल्हा टंचाईकृती आराखड्यासाठी कोट्यावधींची तरतूद

जिल्हा टंचाईकृती आराखड्यासाठी कोट्यावधींची तरतूद
USER

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

उन्हाळ्याच्या (summer) पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा टंचाईकृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

यात ६ कोटी ५५ लाखांची तरतूद करण्यात आली असून त्यात सर्वाधिक खर्च टँकरद्वारे (tanker) पाणी पुरवठा (Water supply) आणि विंधन विहीरी अधिग्रहणाचेच नियोजित आहे यामुळे केंद्रीय जल विभागाची (Central Water Department) 'हर घर जल' ही संकल्पना अजूनही सुरुच झाली नसल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.

टंचाईकृती आराखड्यातून कायमस्वरुपी पाणी पुरवठा (Water supply) योजनांची पुर्तता करणे, नागरिकांना नियमित नळाद्वारे पाणी देण्यासाठी कायमची व्यवस्था करणे या बाबींचा अपेक्षा असताना कार्यकारी यंत्रणा अर्थात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Life Authority), जिल्हा परिषद (zilha parishad) आणि ग्रामीण क्षेत्रातील कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून (Local Self-Government) या मुख्य बाबींवरच गत अनेक वर्षापासून अपेक्षित काम होताना दिसून येत नस्ल्याच्या तक्रारी आहेत.

दरवर्षीच्या टंचाई आराखड्यात केवळ तात्पुरत्या स्वरुपातील उपाययोजनांवरच भर दिला जात अाहे. त्याची पुनरावृत्ती यंदाही झाली आहे. खरं तर केंद्र शासनाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल जलयोजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत प्रत्येक गावात, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यातही पायलट प्रोजेक्ट (Pilot project) सुरु आहे. परंतू, टंचाई कृती आऱाखड्यात मात्र त्याची कुठलेही प्रतिबिंब दिसून आलेले नाही. हा आराखडा आता जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी नंतर विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) आणि तेथून राज्य सरकारकडे अंतिम मंजूरीला पाठविण्यात येणार आहे.

ही आहे तरतूद

प्रगतीतील नळयोजना पूर्ती : १६ योजना असून त्यावर शुन्य रुपयांची तरतूद

विंधन विहींरीसाठी - १ कोटी ५१ लाख ७० हजार

टँकर बैलगाडी द्वारे पाणी पुरवठा - ३ कोटी ६९ लाख

विहीरी खोल करणे - ८७ लाख

खाजगी विहीरी अधिग्रहण- ६३ लाख ५० हजार

नळयोजना विशेश दुरुस्ती - ४ लाख

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com