जिल्ह्यातील ग्रामपंचायतींंच्या पथदीप वीज बिलांसाठी तरतूद

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींंच्या पथदीप वीज बिलांसाठी तरतूद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील १३८२ ग्रामपंचायतीच्या Grampanchayats हद्दीतील पथदिपांच्या वीज बिलांवरून Street lights electricity bills मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.पथदिपांची वीज बिले बिलण्याकरिता शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १७१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.यातून नाशिक जिल्ह्यातील १३८२ ग्रामपंचायतींसाठी सव्वा आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शासनानेच ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे देयके अदा करण्यासाठी जिल्हा परिषदांना निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात त्यासाठी २२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ७५ टक्के मर्यादित १७१ कोटी रुपये शासनाने बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करून दिले आहेत.

त्यापैकी नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला सव्वाआठ कोटी रुपये आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील १३८२ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिवे व नळपाणी पुरवठा योजनेच्या वीज वापरापोटी सुमारे २६० कोटी रुपयांची आवश्यकता असून शासनाने पहिल्या टप्प्यात सव्वाआठ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिवाबत्तीची संख्या, वीज मीटर, ग्रामपंचायतीची लोकसंख्या, एकूण वीज ग्राहक, एकूण दिव्यांची संख्या, कनेक्शनचा प्रकार, एकूण थकबाकी यापैकी अदा केलेले देयक या सर्व बाबींची माहिती सरपंच व ग्रामसेवक यांनी जमा करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.

ग्रामसेवकामार्फत वीज देयक अदा

पथदिपांच्या वीज बिलांची रक्कम थेट ग्रामपंचायतींच्या ताब्यात न देता ग्रामसेवकामार्फत वीज देयक अदा करण्यात यावी, अशा सक्तीच्या सूचना शासनातर्फे करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com