खासगी कोव्हीड रुग्णालयांना पोलिस संरक्षण द्या
USER

खासगी कोव्हीड रुग्णालयांना पोलिस संरक्षण द्या

मानवता हॉस्पीटल तोडफोड : 'आयएमए'ची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नाशिक । Nashik

भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचा भाऊ रोशन घाटेचे उपचारा दरम्यान करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मानवता क्युरी हॉस्पिटलची तोडफोड केली. या घटनेचा निषेध करत हॉस्पिटलकडून आजपासून करोना रुग्ण घेण्यास नकार देण्यात आला आहे. तसेच आयएमए नाशिक शाखेतर्फे मंगळवारी (दि.२७) दुपारी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेत खासगी कोव्हिड सेंटरला चोवीस तास पोलीस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

रोशन घाटे यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबई नाका येथील मानवता क्युरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच सोमवारी मध्यरात्री घाटे समर्थकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत, पार्किंग मध्ये असलेल्या गाड्याच्या काचा फोडल्या. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कुठल्याच कोरोना रुग्णाला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात येणार नाही, असा पवित्रा मानवता क्युरी सेंटर हॉस्पिटलने घेतला आहे. तर रोशन घाटे यांच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. त्यांच्या उपचारा दरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, म्हणून रोशन यांचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. राज नगरकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रोशन यांचे वडील किशोर घाटे यांनी केली आहे.या प्रकाराबाबत इंडियन मेडीकल असोसिएशन नाशिक शाखेतर्फे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले यामध्ये गेल्या चोवीस तासात दोन रुग्णालयावर हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे कोरोना काळातही सदैव कार्यरत असलेले डॉक्टर,आरोग्यसेवक यांच्यामध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे.रुग्णालयाच्या संरक्षणासाठी खासगी कोवीड सेंटरला चोवीस तास पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदन देतांना आयएमचे अध्यक्ष डॉ हेमंत सोननीस,डॉ विशाल पवार,डॉ उमेश नागापुरकर,डॉ राज नगरकर आदी उपस्थित होते.

.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com