रोजगारासाठी कायमस्वरूपी मार्गदर्शन सुविधा द्या

रोजगारासाठी कायमस्वरूपी मार्गदर्शन सुविधा द्या

मेळाव्यात माजी आमदार वाजे यांचे प्रतिपादन

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यात मागील काही दिवसांत रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत असून कामगार शक्ती फाउंडेशनकडून ( Kamgar Shakti Foundation )राबविण्यात आलेला रोजगार मेळावा ( Employment fair ) तरुण-तरुणींसाठी दिशा देणारा ठरणार आहे. युवकांची गरज बघता शहरात कामयस्वरुपाची कन्सल्टन्सीच्या शाखेची सुरुवात करण्याची सुचना माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje ) यांनी केली.

कामगार शक्ती फाऊंडेशनच्या वतीने शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्सवर आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फाऊंडेशन करत असलेले कार्य कौतुकास्पद असून भविष्यातही त्यांच्याकडून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी व्यासपिठावर अ‍ॅडव्हान्स एन्झाइम कंपनीचे चेअरमन किशोर राठी, जिंदाल कंपनीचे एचआर व्यवस्थापक एस. बी. सिन्हा, रिंग प्लस कंपनीचे व्यवस्थापक कमलाकर टाक, सिप्रा कंपनीचे महाव्यवस्थापक मल्लिकार्जुन उमदी, नगराध्यक्ष किरण डगळे, उदय सांगळे, नगरसेवक पंकज मोरे, संजय वामणे, संतोष भडांगे उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी तालुक्यातील तरुणांना रोजगार देण्यामागे शंका येत असे. मात्र, सरवार यांनी प्रत्येक कंपनीतील व्यवस्थापकांसोबत चर्चा करुन या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम केले असल्याचे टाक यांनी सांगितले. डगळे यांनी उपस्थित तरुणांना या संधीचे सोने करुन घेण्याचे आवाहन केले. मेळाव्यामुळे तालुक्यातील तरुणांना मोठी संधी उपलब्ध करुन देण्याचे काम फाउंडेशन करत असून याचा फायदा घेऊन आपले भविष्य उज्जल करा, असे आवाहन राठी यांनी केले.

प्रास्ताविक फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार यांनी केले. सूत्रसंचालन किरण भावसार यांनी केले. आभार सतीश नेहे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आनंदा आव्हाड, किरण भोसले, नवनाथ सरवार, उल्हास सरवार, अविनाश आव्हाड, रवींद्र गिरी यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com