नामकोच्या कोविड हॉस्पिटलला ऑक्सिजन उपलब्ध करून द्या

नामकोच्या कोविड हॉस्पिटलला ऑक्सिजन उपलब्ध करून द्या
कोविड सेंटर

नाशिक । Nashik

करोना संकटात प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी अनेक संस्था पुढे येत असून नामको चॅरिटेबल संस्थेने ५८ बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारले आहे.

परंतू या ठिकाणी आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने कोव्हिड सेंटर अद्याप कार्यन्वित होउ शकले नाही. जिल्हाप्रशासनाने कोव्हिड सेंटरला तत्काळ आॅक्सिजन पुरवठा सुरळित करुन द्यावा अशी मागणी भाजप नगरसेविका प्रा.डाॅ.वर्षा गायकवाड यांनी जिल्हाप्रशासनाकडे केली आहे.


या मागणीचे निवेदन त्यांनी सूरज मांढरे यांना दिले. त्यात म्हटले आहे की नाशिक शहर जिल्ह्यमध्ये करोनाचा प्रसार मोठया प्रमाणात झाला असल्याने कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

बाधित रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाही. हे आपण सर्वजण अनुभवतो आहे. या संकटात अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने काम करीत आहेत. नामको चॅरिटेबल संस्था नाशिकच्या अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असते.

त्यांनी नामको हॉस्पिटलमध्ये अद्यावत असे सर्व स्टाफ,नर्स,वॉर्ड बॉय,डॉक्टर यांसह सर्व सुविधांयुक्त 58 बेड चे कोविड रुग्णालय उभारले आहे. ते ही अवघ्या 10 दिवसांमध्ये. गेल्या सहा सात दिवसापासून हे कोविड रुग्णालय तयार आहे. परंतू ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने ते कार्यान्वित होऊ शकलेले नाही.

करोनामुळे वैद्यकीय क्षेत्रात उभ्या राहिलेल्या संकटात नामकोचे कोविड रुग्णायल कष्टकरी गरीब रुग्णांना दिलासा देणारे ठरणार आहे. या रुग्णालयाला आपण तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com