दिंडोरी
दिंडोरी
नाशिक

डोनेट अ डिव्हाइस उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींस मोबाइल संच प्रदान

दिंडोरी पंचायत समितीच्या वतीने

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

दिंडोरी पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने डोनेट अ डिव्हाइस हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोमल सहाले या गरजू व गरीब विद्यार्थिनीस मोबाईल संच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

करोनाच्या साथीचा फैलाव झाल्याने शाळा बंद झाल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू आहे. दिंडोरी तालुक्यात ऑनलाईन, ऑफलाईन अध्ययन अध्यापन केले जात आहे,ऑनलाईन धडे देतांना बहुतांश विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने मोबाईल, लॅपटॉप, टॅब,संगणक या प्रकारातील कोणतेच साहित्य उपलब्ध नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.

गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांना मोबाइल व इतर डिजिटल साधने दान देण्याचे आवाहन केले, व हे साधने गरजू व गरीब विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. या आवाहनास प्रतिसाद बहुतेक अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. दिंडोरी केंद्राचे केंद्रप्रमुख परशराम चौरे यांनी मोबाईल संच दान केला.सदर मोबाईल संच दिंडोरी जिल्हा परिषद शाळा 1 मधील कोमल सहाले या गरीब व गरजू विद्यार्थिनीस पंचायत समितीच्या सभागृहात मासिक मीटिंगमध्ये मोबाईल संच प्रदान करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सभापती कमिनी चारोस्कर व उपसभापती वनिता ताई अपसुंदे यांच्या हस्ते कोमल सहाले या विद्यार्थिनीस सिमकार्ड सह भेट देण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गट शिक्षण अधिकारी भास्कर कनोज, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com