साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य सुविधा पुरवा

भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची मागणी
साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य सुविधा पुरवा
USER

देवळा । प्रतिनिधी Deola

करोना (Corona) प्रार्दुभावाच्या सावटात सध्या मोठ्यांसह लहान मुलांना ताप, थंडी, खोकला, सर्दी (Fever, chills, cough, chills) यांसह इतर विषाणूजन्य आजार (Viral diseases) डोके वर काढू लागल्याने धास्ती वाढली आहे. जिल्हाभरात डेंग्यू (Dengue) आणि चिकनगुनियाच्या (Chikungunya) रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्यामुळे डॉक्टरांकडे उपचार करून घेण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.

या साथीवर नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी (Local self-governing bodies) तातडीने फवारणी करत इतर आरोग्यसुविधा (Healthcare) पुरवाव्यात अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर (BJP district president Keda Aher) यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत होणार्‍या बदलामुळे लहान मुले व मोठ्यांना तापासह इतर आजार होत आहेत. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारी व खाजगी दवाखान्यातील रूग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. ताप आणि खोकला असला तर काळजीपोटी करोना चाचणी करण्यावरही भर दिला जात आहे. सध्या शहरासह तालुक्यात थंड, ताप, खोकला, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या, पेशी कमी होणे अशा आजारांचे प्रमाण वाढते आहे. त्यात करोनाचे रुग्ण वाढल्याने चिंतेत भर पडत आहे. कोणता आजार आहे याचे निदान होण्यासाठी विविध तपासण्या करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.

रूग्णांनी घरगुती उपचार न करता डॉक्टरांकडून तपासून योग्य असे उपचार (Treatment) करणे गरजेचे असले तरी डासांचे निर्मूलन होण्यासाठी आरोग्य विभागाने (Department of Health) तातडीने पाऊले उचलण्याची मागणी आहेर यांनी केली आहे.

डासांचे प्रमाण कमी होण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद यांनी फवारणी करावी. आरोग्य विभागाच्या वतीने कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जावे. ​ग्रामीण भागातील जनतेला योग्य औषधोपचार मिळण्यासाठी घरोघरी भेटी देत व तपासण्या करत दिलासा द्यावा अशी मागणी आहेर यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे

Related Stories

No stories found.