दिंडोरी तालुक्यातील धरणातील गाळ काढण्यासाठी निधी द्या : गोतरणे

दिंडोरी तालुक्यातील धरणातील गाळ काढण्यासाठी निधी द्या : गोतरणे

ओझे l Oze (वार्ताहर) :

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील दिंडोरी, पेठ, सुरगाणा दौ-यावर आले असता त्यांचे वणी येथे जि. प. सदस्य छायाताई गोतरणे वणी येथे कार्यकत्यांसह स्वागत करण्यात आहे.

यावेळी दिंडोरी तालुक्यातील धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून ३० वर्षापूर्वी धरणामध्ये जे पाणी राहत होते ते आता राहत नसून पाऊस पडल्यांस धरण लवकर भरले जात असून आरक्षणाच्या नियमानुसार निफाड येवला मनमाड तालुक्याला पाणी दिल्या नंतर तालुक्यातील धरणामध्ये पाणी शिल्लक राहत नाही.

त्यामुळे स्थनिक दिंडोरी तालुक्यातील जनतेला शेतीचे सोडा पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यांमुळे धरणाना मधील गाळ काढल्यास पाण्याचा साठा वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल यासाठी तालुक्यातील प्रमुख करंजवण, ओझरखेड, पुणेगाव, वाघाड, धरणातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जि. प. सदस्या छायाताई गोतरणे यानी नामदार जयंत पाटील यांच्याकडे केली.

यावेळी राजेंद्र गोतरणे, माजी जि, प सदस्य विलास कड, शिवसेना नेते ऍड. विलास निरगुडे तसेच वणी गटातील महाविकास आघाडीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com