नियमित कर्ज फेडणार्‍यांना पीककर्ज द्या
नाशिक

नियमित कर्ज फेडणार्‍यांना पीककर्ज द्या

वि.का. सोसायटी फेडरेशनची मागणी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ति योजनेचे नाशिक जिल्हा सहकारी बँकेला ८०० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकर्‍यांना खरीप हंगामात त्वरीत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी कार्यकारी सेवा सहकारी संस्था नाशिक जिल्हा फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

संस्थेच्या सदस्यांनी जिल्हा बॅक अध्यक्ष केदा आहेर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.नाशिक जिल्हा सहकारी बँकेला कर्ज मुक्तीतुन राज्य सरकारच्या वतीने ८०० कोटी प्राप्त झाले आहेत . मात्र बँक अडचणीत आल्यापासून नियमित कर्जदारांना कर्ज वाटप करू शकली नाही. अडचणीच्या काळात त्या शेतकर्‍यांना कर्जाची मदत मिळाली नाही. त्यामुळे नियमित कर्जदारांना कर्जवाटप करावे.

राज्य शासनाने कर्जवाटप साठी निधी अधिक उपलब्ध करून घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नाशिक जिल्हा फेडरेशन वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या प्रसंगी फेडरेशनचे नेते विष्णुपंत गायखे, कार्यध्यक्ष राजू देसले, भाऊसाहेब गायकवाड, संजय गायधनी, संपतराव वक्ते, मनोहर देवरे, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com