आम्हांल इथंच रहायचं, सुपलीची मेट वासीयांची आर्त हाक

आम्हांल इथंच रहायचं, सुपलीची मेट वासीयांची आर्त हाक

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

ब्रह्मगिरी (Bramhgiri) व तीच्या सात मेटा (वस्त्या) तसेच सुपलीची मेट (Suplichi Met) मधील डोंगराळ भागातील मेटकऱ्यानी आम्हाला स्थलांतर नको, मात्र नागरी सुविधा द्या अशी भूमिका प्रशासनासमोर घेतली आहे.

महाड तालुक्यातील (Mahad Taluka) तळीये गावच्या दुर्घटनेच्या (Taliye Incident) पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी (District Administration Officer) सुपलीची मेट येथील ग्रामस्थांची शुक्रवारी दुपारी पुनर्वसनासाठी चर्चा केली.

यावेळी स्थानिक नागरिक म्हणाले की आम्हाला तात्पुरते स्थलांतर नको, मात्र नागरी सुविधा द्या असे सांगितले.

वाडीवरून रुग्ण नेता येईल असा रस्ता असावा तसेच ब्रह्मगिरी, गंगाद्वारवर (Gangadwar) धोकादायक ठिकाणी जाळ्या बसवा, उन्हाळ्यात पाणी टंचाई (Water Crisis) भासू नये यासाठी उपाय योजना करावी या मागण्या केल्या केल्या आहेत.

यावेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com