शहराला समृद्धीच्या वाटेवर आणल्याचा सार्थ अभिमान : महापौर

शहराला समृद्धीच्या वाटेवर आणल्याचा सार्थ अभिमान : महापौर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराला समृद्धीकडे prosperity नेण्यासाठी महापौर या नात्याने मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी कामे केल्याचे मला समाधान वाटते, त्याचप्रमाणे आता खूप काम करायची देखील असून शहरात भव्य आयटी हब, नमामि गोदा प्रकल्प आदी कामे शहरवासियांसाठी करायचे असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी Mayor Satish Kulkarniयांनी दिली. महापौर म्हणून त्यांचा कार्यकाळ आला. दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ते ‘देशदूत’शी बोलत होते.

नाशिक शहर समृद्धीच्या वाटेवर आणल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे. मागील 25 वर्षांत न सुटलेले प्रश्न मार्गी लावले, महापौर म्हणून सक्षम नेतृत्व केलेच तेवढ्याच ताकदीने कामेदेखील केली. करोनाकाळात लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या व अधिक चांगले आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली.

महापौर म्हणून केलेली कामे

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या भारतमाला योजनेअंतर्गत द्वारका ते नाशिकरोड डबलडेकर उड्डाणपुलाची निर्मिती, समृद्धी महामार्ग, सुरत-चेन्नई हैद्राबाद ग्रीन कॉरीडॉर व इतर विविध रस्ते विकास कामास मंजुरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेला गती येण्यासाठी निओ मेट्रो प्रकल्प उभारणी, नंदिनी नदी संवर्धन अभियानाची पर्यावरण दिनापासून सुरू उत्तर महाराष्ट्रातील मनपाचे सर्वात मोठे 1100 बेडचे (2 हॉस्पिटल) निर्माण, महापौर आपल्या प्रभागात दौर्‍यांद्वारे विविध प्रभागातील नागरिकांच्या अनेक तक्रारींचे निवारण, नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी ‘माझा महापौर’ची निर्मिती शहरातील 300 उद्यानांच्या देखभालीकरिता ठेकेदारांकरवी निगा राखली जाते, गोदा तीरावर धार्मिक विधीसाठी शेड उभारणे कामी तरतूद, शहराची स्वच्छता राखणेकामी आधुनिक स्विपींग यंत्राद्वारे डीपी रस्ते झाडणार,

नाशिक शहरातील 22 ते 23 मनपाच्या दुर्लक्षित जागांवर बीओटी तत्वावर मॉल व शॉपिंग सेंटर उभारुन रोजगार निर्मिती आणि मनपाच्या उत्पन्नात वाढ, 15 अ‍ॅम्ब्युलन्स खरेदी कामी निविदा मंजूर, करोना काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून वैद्यकीय आरोग्य सेवांचा सक्षमपणे वापर, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम, जलनेतीसारख्या उपाययोजना करण्यासाठी आग्रह

तसेच अ‍ॅलोपॅथी बरोबरच आयुर्वेदिक, होमिओपॅथी, योगा व जलनेती यासारख्या उपचार पद्धतींबाबत विविध माध्यमांद्वारे जनजागृती. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अधिकचे 8 ऑक्सिजन टँकरचा पुरवठा तसेच गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत,

नाशकातील 550 शाळांमध्ये 3 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना जलनेती यौगिक क्रिया पुस्तिकेचे वाटप व शहरात 1.50 लाख दुकांनां मध्ये करोना प्रतिबंधक जलनेती स्टीकर्सचे वाटप, 24 वर्षांनंतर महापालिकेत मानधनावर भरती प्रक्रियेला महासभेची मंजुरी आदी भरपूर कामे मी महापौर पदाच्या कार्यकाळात यशस्वीरित्या करू शकलो.

नाशिक शहरातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी विशेष असा ‘माझा महापौर अ‍ॅप’ तयार केला होता. अत्यंत आधुनिक पध्दतीने स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याचा मानही त्यांना मिळाला. तर त्याचा उपयोगही नाशिककरांनी करुन घेतला आहे. 2500 पेक्षा जास्त नाशिककारांनी आतापर्यंत अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले असून सुमारे एक हजार तक्रारींचा निपटारा त्याद्वारे करण्यात आला आहे.

महापौर झाल्यावर कुलकर्णी यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करीत नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबर शहराचा समातोल विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न केला, तर नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. त्यांच्या कार्यकाळातील सुमारे दीड वर्षाच्या काळ करोनात गेला.

याकाळातही त्यांनी जलनीतीसह विविध उपयोजना करुन चांगले आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी परिश्रम घेतले. 2020 च्या फेब्रुवारी महिन्यात महापौर कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष तक्रारींची दखल घेण्यासाठी मनपाच्या ई-कनेक्ट अ‍ॅपमध्ये ‘माझा महापौर’ नावाचे फिचर सुरू केले आहे. तर हा अ‍ॅप गुगल प्ले स्टोरमधूनही डाऊनलोड करण्याची सुविधा दिली. अ‍ॅपमुळे तक्रारींची दखल न घेणारे अधिकारी महापौरांच्या रडारवर होते. तक्रारकर्त्या नागरिकांच्या समस्या सुटत नसतील, तर त्यांनी आपल्यापर्यंत थेट पोहोचावे असे यामागे उद्दिष्ट आहे.

शहरवासीयांनी त्यांच्या मनातील नाशिक शहराबद्दलच्या संकल्पना, प्रतिक्रिया नोंदवाव्यात तसेच ज्या नागरिकांना नागरी सुविधांबाबत समस्या भेडसावत असल्यास त्या समस्या ‘माझा महापौर अ‍ॅप’ वर नोंदवून शहर विकासाच्या दृष्टीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचा मोठा उपयोग होतांना दिसत आहे. आतापर्यंत 2 हजार 500पेक्षा जास्त लोकांनी अ‍ॅप डाऊनलोड केला असून रोज त्यात वाढ होते. यामध्ये विविध प्रकारचे कॉलम असून तक्रारींचे स्वतंत्र कॉलम आहे. त्याच प्रमाणे मनपाची माहिती व होत असलेल्या विकास कामांची माहिती देखील याद्वारे नाशिककारांना मिळते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com