Nashik Road News : बिटको रुग्णालयासमोर शिवसेना ठाकरे गटाची तीव्र निदर्शने

Nashik Road News : बिटको रुग्णालयासमोर शिवसेना ठाकरे गटाची तीव्र निदर्शने

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक महापालिकेचे (Nashik Municipal Corporation) सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या बिटको रुग्णालयामधील (Bitco Hospital) समस्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाच्या (ShivSena Thackeray Group) वतीने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. यावेळी तिरडी वर मृत देहाची प्रतिकृती ठेऊन बिटको रुग्णालय प्रशासनाचा निषेध करण्यात आला...

Nashik Road News : बिटको रुग्णालयासमोर शिवसेना ठाकरे गटाची तीव्र निदर्शने
Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे पाटलांनी सरकारपुढे ठेवल्या 'या' मागण्या

नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे गोरगरिबांसाठी महत्त्वाचे रुग्णालय समजले जाते. या रुग्णालयामध्ये नाशिक शहर व ग्रामीण (Nashik City and Rural) भागातील गोरगरीब नागरिक उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, रुग्ण उपचारासाठी आल्यावर त्याला पाहिजे त्या सुविधा मिळत नाही. त्यामुळे रुग्णाला (Patient) खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी जावे लागते. या रुग्णालयामध्ये रुग्णांची सतत गर्दी असते. परिणामी गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेड, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सरकारच्या गैरसोयमुळे अनेक निष्पाप रुग्णांचा बळी गेला. तसा प्रकार येथे होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या.

त्याचप्रमाणे फिजिशियनची नेमणूक करण्यात यावी, सोनोग्राफी मशीन सुरू करण्यात यावी. कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णांचे हाल होतात, त्यामुळे नवीन कर्मचारी भरती करण्यात यावी. रेडिओलॉजीस्टची नेमणूक करण्यात यावी. धूळ खात पडलेले व्हेंटिलेटर मशीन चालू करण्यात यावे. तसेच औषध पुरवठा (Drug Supply) योग्य प्रमाणात करण्यात यावा. बिटको रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे रुग्णांना त्रास होतो, यामुळे योग्य ती स्वच्छता ठेवण्यात यावी. दातांच्या डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी, इंटर कॉम सुविधा सुरू करण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येऊन तीव्र निदर्शने करण्यात आली.

Nashik Road News : बिटको रुग्णालयासमोर शिवसेना ठाकरे गटाची तीव्र निदर्शने
Manoj Jarange Patil Sabha : जालन्यात मनोज जरांगे पाटलांच्या सभेला तुफान गर्दी; संबोधनाकडे महाराष्ट्राचे लक्ष

दरम्यान, या निदर्शनाचे नेतृत्व शिवसेना उपनेते बबनराव घोलप, लोकसभा सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप यांनी केले. यावेळी नितीन चिडे, मसूद जिलानी,केशव पोरजे योगेश देशमुख, नितीन पाटील,सागर निकाळे, विजय भागवत, अमोल आल्हाट, किरण डहाळे, संजय गायकवाड, अस्लम भैय्या मणियार, सुनील गोडसे, नयनाताई घोलप, विक्रम खरोटे,अमित भगत, अनिल गायखे, आत्माराम आढाव, अतुल धोंगडे, विलास थोरात,गणेश गडाख, योगेश गाडेकर, अन्सार शेख, शेखर पवार, सीमा डावखर, गायत्री पगार,जयंत गाडेकर, स्वप्नील औटे, स्वराज खेलूकर, योगिता गायकवाड, सुवर्णा कांळुगे यांच्यासह आदी उपस्थित होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Road News : बिटको रुग्णालयासमोर शिवसेना ठाकरे गटाची तीव्र निदर्शने
10 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा...; मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com