Video : निफाडचे आंदोलक शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना

निफाड | प्रतिनिधी | Niphad

जिल्हा बँक (District Bank) सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या (Farmers) जमिनी हडप करण्याचे काम करीत आहे. त्या विरोधात शेतकरी संघर्ष संघटना, शेतकरी संघटना समन्वय समिती व नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर १६ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे...

Video : निफाडचे आंदोलक शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना
Breaking News : नाशकात आयकर विभागाची छापेमारी

त्यानंतर या आंदोलनाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली असून याप्रश्नी चर्चा करण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची आज (दि.२०) रोजी संध्याकाळी ४ वाजता सह्याद्री अतिथी गृहावर आंदोलकांच्या (Protester) शिष्टमंडळाची भेट घडवून आणणार आहेत.

Video : निफाडचे आंदोलक शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना
राहुल गांधींना पुन्हा खासदारकी? आज निकालाची शक्यता

यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हे शिष्टमंडळ आज सकाळीच मुंबईला (Mumbai) रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, शेतकरी संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष भगवान बोराडे, नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुषार गांगुर्डे, दत्तात्रय सुडके, दिलीप पाटील, अब्दुल शेख, केशव कदम यांचा समावेश आहे.

Video : निफाडचे आंदोलक शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना
मोठी दुर्घटना ! पैसे वाटप कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी; ७९ जणांचा मृत्यू

तसेच नाशिकहून मनसेचे (MNS) प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हाध्यक्ष महेश लासुरे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे, अमित गांगुर्डे, मनोज घोडके यांच्यासह आदींचा समावेश आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com