किसान सभेच्या मोर्चात आंदोलकाचा मृत्यू

News Update | न्यूज अपडेट
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

चांदवड | Chandwad

तालुका किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने विविध मागण्यांसाठी प्रांत व तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात (Agitation) एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले...

चांदवड तालुका किसान सभा (माकपच्या) वतीने विविध मागण्यांसाठी चांदवड प्रांत व तहसीलदार कार्यालयाव मोर्चा काढला. होता मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष हनुमंत गुंजाळ, उपाध्यक्ष राजाराम ठाकरे, तालुका सेक्रेटरी तुकाराम गायकवाड , दौलत वटाणे , रूपचंद ठाकरे , गणपत गुंजाळ ताई बाई पवार, सारिका गुंजाळ आदींनी केले.

सोमनाथ पोपट पवार (56) असे मयताचे नाव आहे. मोर्चातील व्यक्तीला चांदवड तहसील कार्यालय समोरील गेटच्या बाजूला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यास चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यास मालेगाव येथे पाठवण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मोर्चातील कार्यकर्त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com