पाणीप्रश्नी सातपूरकरांचा हंडामोर्चा

पाणीप्रश्नी सातपूरकरांचा हंडामोर्चा

सातपूर । प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेतील (Nashik Municipal Corporation) शिवाजीनगर, श्रमिकनगर, ध्रुवनगर, गंगापूर, अशोकनगर, धर्माजी कालॅनी हा परिसर गंगापूर धरणाच्या (gangapur dam) उशाशी असून सुद्धा व याच ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र (Water Treatment Plant) असूनसुद्धा येथील नागरिकांना पिण्याचे पाणी (drinking water) मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात (Water Supply Department) सावळा गोंधळ चालू आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) वतीने माजी सभागृहनेते दिनकर पाटील (Former House Leader Dinkar Patil) व अमोल पाटील यांच्या वतीने नाशिक महापालिकेवर शेकडो महिलांना सोबत घेत हंडा मोर्चा काढण्यात आला. नाशिक शहरात नुसता पाणी प्रश्नच नाही तर रस्त्यांचीसुद्धा अतिशय भयानक परिस्थिती झाली आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यांना मोठमोठे खड्डे (potholes) पडले आहेत. रस्त्याची कामेसुद्धा अतिशय निष्कृष्ट दर्जाची झालेली आहेत. तेसुद्धा संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घ्यावे. गंगापूर धरण (Gangapur Dam) परिसरात विजेचा प्रश्न नेहमी भेडसावत असतो, त्यासाठी त्या ठिकाणी सोलर सिस्टिमचा (Solar System) पर्याय म्हणून वापर करण्यात यावा. अशा अनेक समस्यांबाबत आज मान्य प्रशासक तथा आयुक्त साहेब नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) यांना निवेदन (memorandum) देण्यात आले.

या सर्व समस्या आठ दिवसांत न सोडविल्यास सर्व नागरिकांना सोबत घेऊन जन आंदोलन उभारण्यात येईल व होणार्‍या परिणामास प्रशासक तथा आयुक्त जबाबदार असतील. याप्रसंगी माजी सभागृहनेता दिनकर पाटील, भाजप सरचिटणीस जगन पाटील, माजी नगरसेविका लता पाटील, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर आदी शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com