साहित्य संमेलन आयोजकांचा निषेध

साहित्य संमेलन आयोजकांचा निषेध

स्वा. सावरकरांना दुर्लक्षित केल्याचा आरोप

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

नाशिक येथे होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात Marathi Litary convention भगूरपुत्र स्वा.वि.दा. सावरकर यांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आल्याने सावरकर समूहाच्या वतीने भगूर येथे काल साहित्य संमेलन आयोजकां विरोधात निषेध सभा घेण्यात आली.

साहित्य संमेलनात सावरकर यांचे चरित्र, कथा, कादंबर्‍या यांचा समावेश यासह प्रवेशद्वार अथवा व्यासपीठाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी यापूर्वीच संमेलनाच्या आयोजकांकडे सावरकर समूहाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र यातील कोणतीही मागणी आयोजकांनी मान्य न केल्याने काल सकाळी भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सावरकर पुतळ्यासमोर निषेध सभा घेण्यात आली.

साहित्य संमेलनावर आधारित तयार करण्यात आलेल्या गीतातदेखील सावरकरांचा नामोल्लेख टाळण्यात आला आहे. या पक्षपाती, संकुचित व दुराग्रही वृत्तीचा व संयोजकांचा सर्व सावरकर प्रेमींनी जाहीर निषेध केला.

यावेळी मनोज कुंवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, प्रशांत आंबेकर, प्रताप गायकवाड, पांडुरंग आंबेकर, संभाजी देशमुख, विशाल शिरसाट, अनंतराव पवार, निशिकांत मोरे, सुनील कासार, जीवन गायकवाड, प्रसाद आडके, विक्रम सोनवणे, विक्रम जुन्नरकर, प्रमोद शेटे, प्रमोद घुमरे, कैलास भोर, भूषण आंबेकर, भूषण कापसे, दादासाहेब देशमुख आदींसह सावरकरप्रेमी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com