नांदगाव
नांदगाव
नाशिक

नांदगाव : वनविभागाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ आमरण उपोषण

Sanjay More

Sanjay More

नांदगाव । प्रतिनिधी

येथील वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी अधिकारी अधिकाराचा दुरुपयोग करित असल्याचा ठपका ठेवत ऑगस्ट रोजी जुन्या तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसिलदार उदय कुलकर्णी यांना उपोषणकर्ते सुरेश शेळके, संपत पवार व संतोष बिन्नर यांनी दिले आहे.

निवेदनात, येथिल वनविभाग तथा वनपरिक्षेत्र अधिकारी, वन परिमंडळ अधिकारी, वन रक्षक हे आपल्या अधिकाराचा गैर वापर करून मनमानी कारभार करित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कार्यक्षेत्रात असलेल्या मौजे हिरेनगर येथिल संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच ग्राम वन समितीच्या पदाधिकार्यांना विश्वासात न घेता टू टेन जेसीबी व ट्रॅक्टर या यंत्राव्दारे जंगलातील काळी कसदार माती उपसा करणे, वृक्षतोड, परगावाहून आलेल्या व्यक्तींचे कुठलेही कागदपत्र न तपासता स्वतःच्या अधिकारात पक्के घरे बांधण्याची तोंडी परवानगी देणे, लागवड केलेल्या झाडांचे संगोपण करण्यास असमर्थता असणे तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समिती व इतर समितींना आलेला निधी समितींच्या खात्यावर वर्ग न करता स्वतःच्या खात्यावर निधी जमा करून बनावट सह्यांचे अफरातफर करून निधीचा गैर वापर करणे असाही आरोप सदर निवेदनात करण्यात आला आहे.

सदर प्रकरणातील अधिकार्यांच्या वागणुक व गैरकारभाराच्या निषेधार्थ 15 ऑगस्ट रोजी या स्वातंत्र्य दिनी जुन्या तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येवून संबंधितांची चौकशी होवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे उपोषणकर्ते सुरेश शेळके, संपत पवार, संतोष बिन्नर यांनी सदर निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्याप्रती उप वन संरक्षक, नाशिक, सहाय्यक उप वन संरक्षक, चांदवड, पोलिस निरीक्षक, नांदगाव यांना पाठविण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com