नांदगाव तहसीलवर कार्यालयावर आक्रोश मोर्चा

नांदगाव तहसीलवर कार्यालयावर आक्रोश मोर्चा

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon

येळकोट येळकोट जय मल्हार,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी) संवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे शुक्रवारी नांदगाव तहसीलवर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील शनिमंदिर गार्डन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाजवळून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 

येळकोट येळकोट जय मल्हार,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नांदगांव तालुक्यातील शेकडो धनगर बांधव व भगिनी हातात झेंडे व फलक घेऊन सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर छोटेखाणी सभेत रूपांतर झाले.

नांदगाव तहसीलवर कार्यालयावर आक्रोश मोर्चा
Nashik News : चालत्या बसचे टायर निघून कारला धडकले

याप्रसंगी गंगाधर बिडगर, साईनाथ गिडगे, डॉ. गणेश चव्हाण, बाळू बोरकर,अण्णा सरोदे, खुशाल सोर, सीताराम पिंगळे, मच्छिंद्र बिडगर आदींनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये धनगर (एस.टी) आरक्षणाची केस सरकारने फास्ट ट्रॅकवर चालवावी, सरकारी वकिलांनी न्यायालयास मागणी करावी, एसटी प्रवर्गात समावेश होईपर्यंत धनगर समाजाच्या विकासासाठी दहा हजार कोटींची तरतूद करावी, मेंढ्या व मेंढपाळांना मोफत विमा द्यावा,

मेंढपाळांना मेंढपाळ सरक्षण कीट शंभर टक्के अनुदानावर द्यावे, सोलर चूल, सोलर बटरी, बैलगाडी, ताडपत्री व स्वसंरक्षणासाठी बंदूक द्यावी, मेंढ्यासाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरू कराव्यात, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, याचे प्रशिक्षण देण्यासाठी इस्राईलसारख्या देशात प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले जाते. त्याप्रमाणे मेंढपाळांना प्रशिक्षण देण्यासाठी परदेशात पाठवावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

नांदगाव तहसीलवर कार्यालयावर आक्रोश मोर्चा
Nashik Crime News : बापानेच दिली मुलाला मारण्याची सुपारी; 70 हजारांत दोघांनी केला खून

यावेळी शहरातील शिवसेना शिंदे गटाचे सुनील जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महेंद्र बोरसे, शिवसेना ठाकरे गटाचे संतोष गुप्ता, काँगेस आयचे मनोज चोपडे, वंचित बहुजन आघाडीच्या आम्रपाली निकम आदींनी पाठींबा दिला. याप्रसंगी तहसील कार्यालयाचे योगेश पाटील यांना नांदगाव तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नांदगाव तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नांदगाव तहसीलवर कार्यालयावर आक्रोश मोर्चा
Gautami Patil : गौतमी पाटीलवर नगरमध्ये गुन्हा दाखल; काय आहे कारण?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com