अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात आंदोलन

अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात आंदोलन

नाशिक l प्रतिनिधी Nashik

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३०० कोटींची प्रलंबित बीले असताना, शासनाकडून एकूण बीलाच्या केवळ २ ते ३ टक्के निधी प्राप्त झाल्याने जिल्हाभरातील ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार, मजूर संस्थाचालक आक्रमक झाले आहेत.

संतप्त झालेल्या ठेकेदारांनी एकजुट करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या दालनात बुधवारी ठिय्या मांडत आंदोलन केले. शासनाकडून प्राप्त झालेला तुटपुंजा निधी पुन्हा परत पाठवून निषेध व्यक्त करत, १०० टक्के निधीची मागणी केली. निधी प्राप्त न झाल्यास थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

जिल्हा बिल्डर असोसिएशन, जिल्हा गव्ह. कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र इंजिनिअरींग असोसिएशन नाशिक शाखेच्यावतीने बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागात प्रलंबीत बीलांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी ठेकेदार, सुबे यांनी अधिक्षक अभियंता सोनवणे यांच्या दालनात भेट घेत ठिय्या मांडला. त्यावेळी सोनवणे यांनी सर्व संघटना प्रतिनिधी, ठेकेदारांशी चर्चा केली. यावेळी प्रलंबीत बीलापोटी प्राप्त झालेल्या निधीतून बीले कशी देणार, कोणाला देणार असे प्रश्न आहे. यासाठी हा निधी शासनाला परत पाठवून द्यावा अशी मागणी करण्यात आली.

बीले प्रलंबित असल्याने दोन ठेकेदारांनी आत्महत्या केल्याचे सांगत १०० टक्के निधी प्राप्त झाल्याशिवाय यापुढे कामे न करण्याचा निर्णय झाल्याचे शासनाला कळविण्यात यावे असे सांगण्यात आले. निधी मिळविण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देत, बीले न मिळाल्यास रस्त्यावर उतरूण आंदोलनाचा इशारा यावेळी आक्रमक ठेकेदारांनी दिला. तक्रारी ऐकूण घेत, निराकरण करण्याचे तसेच शासनाला पत्र पाठवून निधी मागणार असल्याचे आश्वासन सोनवणे यांनी यावेळी दिले.

यावेळी अभय चोकसी, बी. पी. सांगळे, राहुल सुर्यवंशी, विजय घुगे, सुनील कांदे, बी. टी. सांगळे, भास्कर सोनवणे, आर. टी. शिंदे, संजय आव्हाड, निसर्गराज सोनवणे, मिलिंद सैदांणे, अनिल आव्हाड, चंद्रशेखर डांगे, अजित सकाळे, संजय कडनोर, सागर विंचु, किरण देशमुख, अनिल चौघुले, प्रतिक देशमुख, संजय पवार, प्रशांत देवरे, रियाज शेख, अमलो मोरे, अमोल पगारे, महेंद्र भोये, शिवाजी घुगे,संदीप दरगोडे, राजेंद्र पानसरे, हेमंत डांगे, विशाल सकाळे, वैभव देवरे, मोहन भोयटे, महेश पवार, सुयोग मोरे, संतोष सांगळे, दत्तू मुतर्डक, निलेश पाटील, बापू सकाळे, राजू काकड आदी उपस्थित होते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com