रस्त्यांची डागडूजी न केल्यास आंदोलन : दिनकर पाटील

रस्त्यांची डागडूजी न केल्यास आंदोलन : दिनकर पाटील

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) सातपूर विभागातील (Satpur Division) रस्त्यांवरील (road) खड्यांचा (potholes) प्रश्न गंभिर झालेला असून, यावर तातडीने उपाय योजना करावी अन्यथा राजीव गांधी भवनासमोर (Rajiv Gandhi Bhawan) आंदोलन (agitation) करण्याचा इशारा माजी सभागृहनेते दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी दिला आहे.

सातपूर विभागात बहुूतांश रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे (potholes) पडलेले आहेत.त्यात प्रामुख्याने सातपूर गाव (Satpur village), आयटीआय परिसर, सिएट कंपनी परिसर, मळे विभाग, पपय्या चौफूली, मौले हॉल परिसर, अशोक नगर चौफूलीसोमेश्वर रोड,सातपूर अंबड लिंक रोड, खोका मार्केट परिसर, तसेच श्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवननगर तसेच कार्बन कंपनी च्या आसपास नव्याने विकसित होणारा भागातील रस्त्यांवर पहिल्याच पावसामुळे (rain) खड्डे पडले असून, त्यात पाणी साचत आहे.

त्यामुळे वाहन चालकांसाठी ते धोकादायक बनले आहेत. पाणी साचण्यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात महानगरपालिकेचे शहर अभियंता नितीन वंजारी (City Engineer Nitin Vanjari), कार्यकारी अभियंता सचिन जाधव (Executive Engineer Sachin Jadhav) यांना वारंवार तक्रार करूनही त्यांच्या दुर्लक्ष करित असल्यामुळे दिनकर पाटील यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मनपाचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील, भारतीय युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या पाठपूराव्याने कार्यकारी अभियंता सचिन जाधव,कनिष्ठ अभियंता संजय गावित व संबंधीत विभागाच्या अधिकार्यांनी या परिसरातील रस्ते व खड्डे जागेवर जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली. त्यामुळे वाहनचालकांना होणारे अपघात व नागरिकांच्या आरोग्याला होणारा धोका त्यांच्या लक्षात आणून दिला.

सदरचे रस्ते तातडीने दुरुस्त करुन द्यावेत अन्यथा होणार्या अपघातांना वाहन चालकांना होणार्या त्रासाला संबंधित अधिकारी जबाबदार धरण्यात येई, असा इशारा पाटील यांनी दिला.कामाला दिरंगाई केल्यास राजीव गांधी भवन समोर तसेच शहर अभियंत्यांच्या दालनात आंदोलन करण्यात इशारा दिनकर पाटील यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com