
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या (Maratha Community) वतीने महामार्गावर (Highway) पांडवलेणी समोर आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली....
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध दर्शविला होता. तसेच मी उद्या नाशिकमध्ये येऊन दाखवतो तुम्ही मला आडवून दाखवा असे जाहीर आवाहन केल्याने मराठा समाज बांधवांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांना काळे फासण्याकरिता मराठा समाजाचे निवृत्ती जगताप, शिवा सुराशे, प्रवीण कदम, राजेंद्र बोरगुडे, प्रमोद पाटील, वाल्मीक बोरगुडे, सदाशिव कोटकर, केदार फापळे, प्रसाद फापळे, अभिप्राय घोटेकर, प्रतीक फापाळे, राजेश भडांगे, संदीप फापाळे, राहुल घोटेकर यांच्यासह असंख्य मराठा बांधव (दि.२८) रात्री आठ वाजेपासून घोटी टोल नाका येथे तळ ठोकून बसले होते.
मात्र, सदावर्ते नाशिकला (Nashik) न आल्याने सर्व कार्यकर्त्यांनी नाशिकच्या वेशीवर पांडवलेणी समोर महामार्गावर येत सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी मराठा समाजातर्फे सदावर्ते यांनी नाशकात प्रवेश करून दाखवावा त्यानंतर मराठा समाजाची ताकद आम्ही दाखवून देतो असे खुले आवाहन केले.